[Marathi] मुंबई, नागपूर, अकोला येथे मोठया प्रमाणात पावसाची हजेरी; पुणे, नाशिकमध्ये हलका पाऊस

June 29, 2018 3:51 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भरपूर पाऊस चालू झाला आहे. तथापि, विदर्भ आणि कोकण क्षेत्रावर पावसाची तीव्रता मध्यम ते भिन्न अशी आहे . दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर दुसरीकडे मराठवाडा क्षेत्र हलका पाऊस झाल्यामुळे बरेचसे कोरडेच राहिले आहे. सध्या, सर्व विभागामध्ये सामान्य पावसापेक्षा जास्ती पावसाची नोंद झाली आहे .

कोकण ४७% अधिक , मराठवाडा ३९% अधिक , मध्य महाराष्ट्र १५% अतिरिक्त पाऊस, आणि विदर्भ अतिरिक्त १२%पाऊस आहे. हा पाऊस होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सागरी किनाऱ्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा त्यामुळे वारे सध्या दक्षिण गुजरातपासून केरळच्या किनारपट्टीकडे वाहत आहेत

याचबरोबर पूर्व पश्चिम दिशेने हि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे मध्य प्रेदशकडून येणारे वारे विदर्भ ओलांडून दक्षिण छत्तीसगड कडे वाहत आहे . गुरुवारी सकाळी ०८. ३० पासून २४ तासात नागपूर येथे पाऊस ६९ मिमी, वर्धा ६६ मिमी, डहाणू ३७ मिमी, महाबळेश्वर ३६ मिमी, मुंबई सान्ता क्रूज़ वेधशाळा २९ मिमी ,ब्रह्मपुरी २६ मिमी, रत्नागिरी २३ मिमी, कुलाबा १९ मिमी, वेंगुर्ला १७ मि.मी., गोंदिया १३ मिमी, कोल्हापूर ११ मिमी, चंद्रपूर ७ मिमी, यवतमाळ ६ मिमी व नाशिक २ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार विदर्भ व कोकण विभागात पुढील दोन दिवस चांगला पाऊस होईल अशी शक्यता आहे, दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र मध्ये माञ हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू;

शेतकरी बंधूनी तांदूळ लावणी सुरु ठेवावी ,भुईमूग व इतर खरीफ पिकांसाठी जमीन तयार करून ठेवावी . तसेच कोकणामधील शेतकरी बंधूनी आंबा ,सुपारी ,फणस इतर फळ पिकांची लागवड करावी . मध्य महाराष्ट्र मधील शेतकरी मित्रांनी उसाची लागवड करावी व त्यापूर्वी बियाण्याला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी .

Image Credit:  Wikipedia          

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

 

 

 

OTHER LATEST STORIES