मौसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला चांगला पाऊस प्राप्त झाला आहे . ह्या पावसामुळे कमाल तापमान ४५ अंशावरून ३० अंशापर्यंत कमी झाले आहे . कालही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी चांगला पाऊस झाला .
कोकणच्या बहुतांश भागात खूप जास्त पाऊस झाला. तथापि, कोकण विभागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. दरम्यान, उत्तर कोकणातील काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला . याशिवाय, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची नोंद झाली आहे .
रविवारी सकाळी ८. ३० पासुन २४ तासात रत्नागिरी आणि वेंगुर्ला येथे अनुक्रमे १६३ व १२६ मिमी एवढा पाऊस झाला . तसेच महाबळेश्वर येथे ७६ मिमी, नागपूर ६९ मिमी, परभणी ४८ मिमी, यवतमाळ २७ मिमी, कोल्हापूर २० मिमी, अमरावती २० मि.मी., अकोला ८ मि.मी. आणि सांगली 6 मिमी आणि उदगीर या ठिकाणी 76 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
स्काय मेट वेदरच्या हवामान अंदाजानुसार वारे सध्या महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीकडून केरळच्या किनारपट्टीकडे वाहत आहे ,यामुळे, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्र तसेच रत्नागिरी, वेंगुर्ला, सांगली, सातारा या ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
[yuzo_related]
या व्यतिरिक्त,कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले वारे बांग्लादेश पासुन विदर्भ ओलांडून आंध्र प्रदेश कडे वाहत आहे त्यामुळेच पुढील २४ ते ४८ तासात विदर्भ आणि मराठवाडा मधील चंद्रपूर, परभणी, अकोला, नांदेड या ठीकाणीपण पाऊस होऊ शकतो . मुबई ,उत्तर कोकण ,उत्तर मध्य महाराष्ट्र ,पुणे या ठिकाणी सुद्धा हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात हवामान ढगाळ राहील .
हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू ;
पावसाचे वातावरण असल्यामुळे हवा जॊरात वाहत आहे त्यामुळे शेतकरी बंधूना सल्ला आहे कि त्यांनी केळी ,भाजीपाला ,वेल यांना आधार द्यावा . पानी पिकास देणे टाळावे ,खरीफ पिकांची पेरणी व सर्व तयारी करून ठेवावी . (कापूस, मूग, उडीद, सोयाबीन इ)
Image Credit: Mumbai mirrors.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com