[Marathi] आज नाशिकमध्ये पीएम मोदींच्या रॅलीत हलक्या पावसासह काही मध्यम सरींची शक्यता

September 19, 2019 12:31 PM | Skymet Weather Team

आज नाशिकमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या रॅली दरम्यान स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांनी एक दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये १२ मिमी पाऊस झाला. गेल्या महिन्याभरापासून शहरात कोणताही मुसळधार पाऊस झाला नाही, तथापि, एक दोन ठिकाणी अधून मधून मध्यम सरींची नोंद करण्यात आली होती.

सध्या मध्य महाराष्ट्रात चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात सध्यातरी मुसळधार पावसाची शक्यता पूर्णपणे नाकारली गेली आहे.

तथापि, दुपारच्या दरम्यान काही मध्यम सरी बरसतील परंतु यामुळे प्रधानमंत्री मोदींच्या रॅलीत कोणत्याही अडथळा निर्माण होणार नाही.

दिवसाचे तापमान उबदार असले तरी तब्बल २८ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील. आकाशातील वातावरण ढगाळ असेल.

सप्टेंबर महिन्यात नाशिकमध्ये मासिक सरासरी पाऊस १३१.५ मिमी इतका आहे. आतापर्यंत शहरात ९५ मि.मी. पाऊस पडला आहे. शहरात मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु सेप्टेंबरच्या राहिलेल्या दिवसांत मुसळधार पावसाची अपेक्षा कमी आहे.

Image Credits – The Financial Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES