मराठवाडा हा महाराष्ट्राचा एक उपभाग असून त्या भागात दरवर्षी नैसर्गिकरीत्याच पाऊस कमी होण्याकडे कल असतो. मराठवाडा हा भाग विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या मध्ये असल्याने त्याभागात होणाऱ्या पावसाच्या नोंदीत कायमच फरक दिसून येतो.
जर आपण मराठवाड्यातील गेल्या दहा वर्षातील पावसाच्या नोंदीचा तपशील बघितला तर असेच लक्षात येते कि बऱ्याचदा मराठवाड्यात सरासरी गाठलेली नाही. या संदर्भात खालील तक्त्यात गेल्या १० वर्षातील पावसाची नोंद नमूद केलेली आहे.
तसेच या माहितीवरून असे लक्षात येथे कि गेल्या दहा वर्षात २०१४ या वर्षात सर्वात कमी पाऊस झाला आणि दहा पैकी सहा वर्षात दुष्काळ किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
या वर्षी जून महिन्यात मात्र संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी दिली होती आणि या पावसाची नोंद ११६% झाली होती. पण मराठवाड्यात मात्र तेव्हाही १७% पावसाची कमतरता होतीच.जुलै महिन्यात तर हि उणीव अजूनच वाढली आणि ७५% झाली. कृषिक्षेत्राचा विचार करता हि खूपच चिंताग्रस्थ बाब होती. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २५% पावसाची कमतरता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बराच दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात चांगल्याच पावसाची नोंद झाली आहे. ११ ऑगस्ट ला मराठवाड्यात ७.६ मिमी पावसाची नोंद झाली असुन साधारणपणे सरासरी ६.६ मिमी असते. तसेच १२ ऑगस्ट ला या भागात १९.३ मिमी पावसाची नोंद झाली असून साधारण नोंद ५.८ मिमी असते. या दोन दिवसात झालेल्या जास्त पावसामुळे या भागातील या मोसमातील पावसाची कमतरता ५२% वरून ४७% झाली आहे.तसेच येत्या ४८ तासात असाच चांगला पाऊस सुरु राहील. हा पाऊस पूर्ण कमतरता भरून काढणार नक्कीच नसेल परंतु यामुळे थोडासा दिलासा नक्की मिळेल.
Image Credit: dna.com