[Marathi] मुंबईत आगामी तीन-चार दिवस हलक्या सरी, तापमानात वाढ अपेक्षित

October 6, 2019 3:10 PM | Skymet Weather Team

मुंबई शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तुरळक हलक्या सरींसह उष्ण व कोरडे वातावरण आहे. तथापि, लक्षणीय पाऊस न झाल्याने तापमानात वाढ होत आहे.

गेल्या २४ तासांत पावसाळी गतिविधी कमकुवत राहिल्या असून सांताक्रूझ वेधशाळेत देखील केवळ तुरळक सरींची नोंद झाली आहे.

सध्या शहराच्या सानिध्यात असलेल्या हवामान प्रणाली बद्दल सांगायचे तर एक चक्राकार परिभ्रमण सध्या उत्तर तेलंगाणा आणि लगतच्या मराठवाड्यावर स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे, ईशान्येकडून येणारे गरम आणि आर्द्र वारे शहरावर परिणाम करीत आहेत.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार हि प्रणाली हळूहळू मार्गक्रमण करेल, त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत मुंबई शहरात गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे.

पाऊस प्रामुख्याने हलका असेल व मुसळधार पावसाची शक्यता नाही. शिवाय, लक्षणीय पाऊस न झाल्यास कमाल तापमानात वाढ होवून ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा असून किमान तापमान २५ अंशाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

पुढचे काही दिवस वाऱ्यांची दिशा बदलून पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची जागा ईशान्येकडून येणारे वारे घेतील त्यामुळे हवामान तुलनेने कमी दमट असेल.

Image Credits – Newsmobile 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES