मुंबईत या आठवड्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्यानंतर, वरुण देवाने आपले लक्ष थोडेसे वळविले आहे. मात्र शहरातून पाऊस पूर्णपणे नाहीसा झालेला नाही.
गेल्या २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी नोंदल्या गेल्या. सांताक्रूझ वेधशाळेत केवळ १ मिमी, तर कुलाबा येथे १.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचवेळी डहाणूच्या आसपासच्या भागात २.२ मिमी, अलिबागमध्ये १ मिमी तर ठाण्यात पाऊस पडला नाही. सुटकेची बाब म्हणजे काल तापमान सामान्य राहिले.
Also, read- MUMBAI TO RECEIVE SOME LIGHT RAINS TODAY AS WELL, RAINY WEEK AHEAD
ईशान्य अरबी समुद्र आणि दक्षिण-पश्चिम गुजरात किनाऱ्यावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील २४ तासांमध्ये ह्या प्रणालीची तीव्रता किरकोळ प्रमाणात वाढू शकते. याशिवाय नैऋत्य दिशेने हलके ते मध्यम वारे मुंबई व आसपासच्या किनारपट्टीवर वाहत आहेत.
तसेच सद्यस्थिती असे दर्शवते आहे कि येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईत हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर, या क्षेत्रावर पाऊस किरकोळ प्रमाणात वाढेल, परंतु त्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. आज शहरात ३ ते ५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत पुढील काही दिवस तापमान सर्वसामान्य राहण्याची अपेक्षा आहे. आज देखील दिवसाचे तापमान सुमारे ३१ अंशांपर्यंत पोहोचेल तर किमान तापमान २५ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
येत्या सात दिवसांत मुंबईत हलक्या सरी कायम राहण्याची शक्यता असून यावेळी मान्सून शहरातून परतण्यास वेळ लागेल असे दिसते.
Image Credits – Mumbai Mirror
Any information taken from here should be credited to Skymet Weather