[Marathi] मुंबईत हलक्या सरी सुरूच राहणार, मतदानात व्यत्यय नाही

October 21, 2019 1:24 PM | Skymet Weather Team

यावर्षी नैऋत्य मान्सूनचा हंगाम मुंबईकरिता दमदार राहिला. खरं तर, सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पावसाच्या संदर्भातले अनेक विक्रम मोडले गेले.

आता, नैऋत्य मान्सूनने ईशान्य मान्सूनच्या आगमनासाठी मार्ग सुकर करून शहराचा अधिकृतपणे निरोप घेतला आहे. तथापि, शहर अद्यापही पावसाळी गतिविधी सुरूच असून पाऊस अखेर कधी थांबेल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पाऊस सुरूच आहे. तथापि, शहरात हलक्या सरी अनुभवल्या जात असून उपनगरात मात्र काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवला गेला.

गेल्या २४ तासांच्या कालावधीत ठाण्यात १९ मिमी, कुलाबा येथे ६ मिमी तर सांताक्रूझमध्ये ४ मिमी पावसाची नोंद झाली.

या पावसाळी गतिविधींचे श्रेय अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राला दिले जाऊ शकते ज्यामुळे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आर्द्रतेत वाढ झाली आहे.

दरम्यान किमान पुढील २४ तास मुंबई शहरात हलक्या सरी सुरूच राहण्याची शक्यता आहे. शिवाय या पावसाळी गतिविधिंमुळे तापमानातही घट झाली आहे ज्यामुळे अजून किमान दोन दिवस मुंबईकरांना सुखद हवामान अनुभवण्यास मिळेल.

Image Credits – Times Now

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES