[Marathi] पुढील २४ ते ३६ तास मुंबईत पाऊस हलका राहील, त्यानंतर किंचित वाढणे अपेक्षित

September 29, 2019 1:41 PM | Skymet Weather Team

मुंबईचा पाऊस हलका झाला आहे आणि कुलाबात फक्त ०.४ मिमी नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ येथे शनिवारी सकाळी साडेआठपासून चोवीस तासांत ०.२ मिमी पाऊस पडला आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, संघटित लो प्रेशर एरिया हा पूर्वोत्तर अरबी समुद्रावर आणि कच्छच्या आसपासच्या भागांवर आहे.

या हवामान प्रणालीमुळे उष्ण वारे गुजरातच्या दिशेने वळत आहेत. त्याचा प्रभाव मुंबईवर देखील दिसेल आणि शहरात उबदार व दमट हवामानासह हलका पाऊस पाहायला मिळेल. आकाशही ढगाळ असेल. या सर्व हवामान स्थिती पुढील २४ ते ३६ तासांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिवसाचे तापमान २९ ते ३१ डिग्री सेल्सियस असेल व रात्री तापमान २५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

२४ ते ३६ तासांनंतर पावसाच्या तीव्रतेत किंचित वाढ होण्याची शक्यता असून मुंबई व उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी आणि अलिबागसारख्या उपनगरासह कुलाबा, मलाड, मुलुंड, दादर, अंधेरी यासारख्या ठिकाणी पाऊस पडू शकतो.

१ जून ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, चांगल्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण आणि गोव्यासह मुंबईत ५३ टक्के पाऊस अधिशेष आहे.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES