कोकण आणि गोवा प्रदेश हा देशातील सर्वाधिक पावसाचा विभाग आहे. खरं तर, कर्नाटक राज्यानंतर देशव्यापी पावसात हा विभाग दुसरा सर्वात मोठा वाटेकरी आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात कर्नाटकात सरासरी ३१७४ मिमी पाऊस पडतो, तर कोकण आणि गोवा येथे २९१५ मिमी पाऊस पडतो.
परंतु या मान्सून हंगामात कोकण आणि गोवा विभाग विक्रम नोंद करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत २९१५ मिमी सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४२९८.३ मिमी पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत ५३ टक्के अधिक आहे. सप्टेंबर महिना संपण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. तर उर्वरित दिवसात पावसाची शक्यता असल्याने ह्या टक्केवारीत वाढ होवू शकते.
या पावसात मोठ्या प्रमाणात योगदान देणारे मुंबई, डहाणू, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी आणि महाबळेश्वर हे जिल्हे आहेत. खरं तर, हर्णे वगळता उर्वरित सर्व जागांनी सप्टेंबरमधील पावसाच्या दहा वर्ष जुन्या विक्रमाला मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
कोकण आणि गोव्यातील पर्जन्यमानाचा अंदाज घेतला तर सरासरी पाऊस खूप जास्त असतो, ज्यामुळे या प्रदेशाचे महाराष्ट्रातील पावसात योगदान मोठे असते. कोकण आणि गोव्यातील मान्सूनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फारच कमी वेळेस सरासरीपेक्षा कमी होतो. गेल्या १५ वर्षात, या विभागात कमी पावसाची फक्त एकाच वर्षी नोंद (२०१५) झाली आहे. खालील तक्ता ह्या बाबी स्पष्ट करतो.
टीपः +/- १९% पाऊस सामान्य मानला जातो