[Marathi] सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता; चिकूच्या बागेला गरजेनुसार पानी द्यावे

May 28, 2018 3:14 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने थोडीशी माघार घेतली आहे.

तथापि, विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे . दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्ती उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानमध्ये घट झाली आहे . त्यामुळे सध्या तेथील तापमान ४० अंशापर्यंत नोंदविले जात आहे . रविवारी सकाळी ८. ३० वाजल्यापासून २४ तासात नागपुर येथे ३५. ८ मिमी, सातारा ३३ मिमी ,कोल्हापूर ७ मिमी तर वर्धा येथे १. ६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे व त्यामुळे वारे सध्या मध्य प्रदेशाकडून विदर्भ ओलांडून दक्षिण मध्य महाराष्ट्रकडे वाटचाल करत आहे यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत आणि विदर्भातील काही भागांत पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. ह्या पावसाचा परीणाम असा होईल कि त्यामुळेपुढील २४ ते ४८ तासात महाराष्ट्रातील उष्ण लाट सर्व ठिकाणची कामी होऊन तापमानामध्ये सुध्दा घट होईल.

[yuzo_related]

दक्षिण महाराष्ट्रामध्ये ३० मे पासून मौसमी पावसाचे आगमन होईल अशी अपेक्षा आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रमध्ये जून च्या पहिल्या आठवड्यपासून पावसाचे आगमन होऊ शकते.

महाराष्ट्र कृषी पट्ट्यावर हवामानाचा होणारा परीणाम पाहू;

खरीफ पेरणी ची तयारी म्हणून शेतकरी बंधूनी जमिनीची खोल नांगरणी ,कोळपणी करून ठेवावी त्यामुळे पीक वाढीला मदत होते . कोकण मधील शेतकरी बंधूनी तांदूळ व नाचणी पीक लावणीची तयारी करावी . मराठवाड्यात लिंबूवर्गीय आणि डाळिंब सारख्या फळांच्या वाळलेल्या व खराब झालेल्या फांद्या फुल बहर येनाच्या आधिच काढून टाकाव्यात. चिकूच्या बागेला गरजेनुसार पानी द्यावे .  

Image Credit: Wikipedia

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

OTHER LATEST STORIES