Skymet weather

[Marathi] मान्सून कधी आपल्या शहरातून माघार घेईल?

September 17, 2019 10:57 AM |

Monsoon withdrawal

हवामानाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये आहे. कारण येथे निश्चित वातावरण आहे. हंगाम निर्धारित आहे.तीनही हंगामात म्हणजेच उन्हाळा, थंडी आणि पावसाळा, यापैकी पावसाळा भारताच्या संपूर्ण वर्षाच्या हवामानाला प्रभावित करतो. तसेच पावसाचा थेट संबंध शेतीशी आहे.

सर्वात आधी मान्सून कधी आणि कुठे पोहोचतो याबद्दल बोलूया. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर साधारणपणे २० मेच्या सुमारास मान्सूनचा आगमन होतो. सुमारे १० दिवसांच्या अंतराने, मान्सून केरळमार्गे भारताच्या मुख्य भूमीवर धडकतो. अशाप्रकारे तो दक्षिण भारता पासून ४ महिन्यांचा लांब प्रवास सुरू करतो. सामान्यत: मान्सून प्रत्येक पाच दिवसांच्या अंतराने वाढत जातो.मान्सूनचा शेवटचा टप्पा म्हणजे राजस्थान, जेथे मॉन्सून १५ जुलैच्या आसपास येतो.

आता मान्सूनच्या परतीबद्दल बोलूया

राजस्थानच्या पश्चिम भागांत मान्सून सर्वात उशीरा पोहोचतो. पण येथून त्याची परत प्रथम होते. ज्याप्रकारे मान्सूनच्या आगमनाच्या घोषणेसाठी काही विशिष्ट परिस्थिती असतात, त्याचप्रमाणे परतण्यासाठी देखील काही निर्धारित परिस्थिति आहे.

सलग ५ दिवस पावसाची अनुपस्थिती, वाऱ्यांच्या प्रवृत्तीत बदल, विपरीत चक्रवाती परिस्थिती तयार होणे किंवा आर्द्रता कमी होणे व तापमानात वाढ होणे या परिस्थिती जेव्हा एखाद्या क्षेत्रात दिसून येतात तेव्हा मान्सूनची परतण्याची वेळ मानली जाते.

मान्सून सामान्यत: १ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतायला सुरुवात करतो आणि उत्तर भारतातील मैदानावर तसेच पर्वतावर १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान माघार घेण्यास सुरुवात करतो. म्हणजेच मान्सूनचा प्रभाव या भागांवर संपतो.

यावर्षी आत्तापार्येंत मान्सूनची माघार सुरू झालेली नाही आहे. माघील काही वर्षांतही अशीच परिस्थिती दिसून आली आहे. २०१० ते २०१८ दरम्यान फक्त एकदाच, २०१५ मध्ये १५ सप्टेंबरपूर्वीच, मान्सूनने बॅक गियर लावला होता. उर्वरित ८ वर्षात, १५ सप्टेंबरनंतरच मान्सूनची माघार सुरू झाली.

गेल्या दोन वर्षात २०१७ आणि २०१८ मध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत मान्सूनच्या परतीची वेळ वाढविण्यात आली होती. यावेळीही १५ सप्टेंबरनंतरच पश्चिम राजस्थानातून मान्सून परतण्याची शक्यता आहे. आम्ही हे पण सांगू इच्छित आहो कि मान्सूनच्या परतीचा अर्थ असा नाही की पाऊस आता पडणारच नाही.तसेच, मान्सूनच्या आगमनाचा अर्थ असा नाही की सतत चांगला पाऊस पडणारच.

Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try