भारतीय उपखंडात मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असते. तसेच देशाच्या काही भागांमध्ये विशेषतः राजस्थान आणि गुजरातमधे ऑक्टोबरमध्ये मान्सूनच्या हंगामानंतर उष्णतेची लाट दिसून येते.
या कालखंडात वाऱ्यांची दिशा बदलते, आर्द्रता कमी होते आणि तीव्र सूर्यप्रकाश असतो. राजस्थान आणि गुजरातमध्ये तापमान चाळीस अंशापेक्षा जास्त असते. तसेच पश्चिम बंगालमधील मिदनापूर आणि कोलकातासारख्या ठिकाणी मान्सून हंगाम लवकर संपल्यास उष्णतेची लाट दिसून येते. दरम्यान खूप काळ पावसाची अनुपस्थिती, उत्तरपश्चिमी कोरडे आणि धूळयुक्त वारे यामुळे उत्तर भारतात उष्णेतची लाट येते. मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेच्या लाटेसाठी हि स्थिती पूरक असते. तसेच पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्ये मार्च महिन्यात खूप उष्णता असते. या महिन्यात तापमानाचा पारा चाळीशी ओलांडतो. सर्व साधारणपणे जेव्हा तापमान सामान्यपेक्षा ५ अंशानी जास्त आणि तापमानाचा पारा ४० अंशाला पोहोचतो तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.
राजस्थान आणि गुजरातमध्ये मान्सूनपूर्व हंगामात देखील तापमान ४० ते ५० अंश दरम्यान असते. तसेच ओडिशातील काही ठिकाणे, मध्यप्रदेशचा मध्य भाग, महाराष्ट्र, दक्षिण तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांतही उष्णतेच्या लाटेची परिस्थिती दिसून येते. मान्सून कालावधीत, जर काही काळ मान्सून निष्क्रिय असेल आणि आकाश ढगाळ असेल तर पारा चढत नाही. या काळात ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांत उष्णता देखील वाढत नाही.
उलट, उत्तरपश्चिमी भारतात मान्सून हंगामादरम्यान उष्णतेच्या लाटेची स्थिती असणे सामान्य असते कारण पंजाब आणि हरियाणामध्ये मान्सूनचा प्रवाह खूपच कमकुवत असून वारे पश्चिमोत्तर दिशा बदलत राहतात. उदाहरणार्थ, ११ जुलै रोजी, पालममध्ये ४०.६ अंश तापमान नोंदविले जे सामान्यपेक्षा पाच अंशाने जास्त आहे अशी स्थिती उष्णतेची लाट म्हणून ओळखले जाण्यास पुरेशी आहे.
या काळात उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीसाठी देशातील पूर्वोत्तर राज्य, किनाऱ्यालगतची ठिकाणे आणि पर्वतीय प्रदेश हे अपवाद आहेत. मान्सूनच्या हंगामात, जेथे मान्सूनचा प्रवाह अधिक प्रचलित असेल तेथून उष्णता नाहीशी होते. दक्षिण द्वीपकल्प तसेच महाराष्ट्रामध्ये या काळात जास्त उष्ण वातावरण नसते तसेच पारा चाळीशीच्या आत असतो.
हैद्राबाद, नागपूर, गुलबर्गा, भुवनेश्वर, जमशेदपूर, कोलकाता या ठिकाणी मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट असते परंतु मान्सूनच्या हंगामात पारा ४० अंशापेक्षा कमी असतो. मात्र लखनऊ, मिरत आणि कानपूर येथे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचते. याउलट परिस्थिती मान्सून दरम्यान गुजरातमध्ये असते, परंतु अघटित घटना दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाहीत. भुज, नलिया, वडोदरा येथे पारा चाळीशी पार नाही करणार तसेच कोणतीही पावसाळी गतिविधी असणार नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे