आतापर्यंत संपूर्ण भारतात मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच झाला आहे. याला प्रमुख कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीला तसेच भारताच्या ईशान्ये कडील भागात झालेला कमी पाऊस आहे. भारतात मान्सूनच्या काळात या दोन्ही भागात नेहमी सर्वात जास्त पाऊस होत असतो.
सर्वसाधारणपणे भारताच्या ईशान्ये दिशेकडील भागात भरपूर प्रमाणात पाऊस होत असतो पण यंदा मात्र या भागात म्हणावा तसा जोरदार पाऊस झाला नाही. तसेच दक्षिण भारतातही कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, कोकण आणि गोवा हे भागही पावसाच्या कमतरतेच्या यादीत सामील झाले आहे. कारण मान्सून पश्चिमेकडून तसा फारसा सक्रीय झालाच नाही.असे असले तरी वर उल्लेख केलेले भाग कृषी उत्पन्नाच्या दृष्टीने थोडे कमी महत्वाचे असल्याने त्याचा परिणाम धान्य उत्पादनावर फारसा होणार नाही.
जेव्हा आपण संपूर्ण भारताच्या पिक उत्पादना विषयी बोलतो तेव्हा गेल्या काही आठवड्यांपासून कमी पावसाचा परिणाम झालेले भाग म्हणजे उत्तर कर्नाटकातील भाग, मराठवाडा, रायलसीमा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश हे आहेत. या भागातील पिकांना आता मान्सूनच्या पावसाची खूप गरज आहे. या भागातील पावसाची कमतरता आता धोक्याच्या पातळीला जाऊन ठेपली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कर्नाटकातील भागात चांगल्या पावसाची हजेरी लागलेली आहे. तसेच रायलसीमा आणि मराठ्वाडा येथेही तुरळक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशाच्या पूर्वेला आणि बिहार येथेही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. थोडक्यात या भागात पाऊस होऊन थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या २४ तासात उत्तर कर्नाटकातील आतील भागात, विजापूर येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली असून गदग येथे ५७.४ मिमी, रायचूर येथे ५ मिमी आणि मादेकारी येथे १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात भर म्हणून रायलसीमा येथेही तुरळक पावसाची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत बिहार आणि त्या लगतच्या झारखंड या भागांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या हवामान प्रणालीमुळे बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे. तसेच या क्षेत्राचा प्रभाव रायलसीमा पर्यंत वाढून यामुळे आंध्रप्रदेशाची किनारपट्टी आणि रायलसीमा येथे चांगला पाऊस होईल. पश्चिम किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाच्या पट्टा तयार होताना दिसून आला असून त्यामुळे कर्नाटकातील भागात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा आहे.
या सर्वातून एकाच बाब लक्षात येते ती म्हणजे सांखिकी दृष्ट्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जरी कमी असले तरी झालेला पाऊस हा व्यापक होता. त्यामुळे जो भाग पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे त्या भागातील पिकांचेही फारसे नुकसान होणार नाही. पावसाची आकडेवारी जरी पाऊस कमी झालेला दर्शवत असली तरी अजून पर्यंत भारतातील बहुतांश भागात पिकांच्या दृष्टीने परिस्थिती खूपशी गंभीर नाही.