महाराष्ट्राचे कमाल वाढलेले तापमान सध्या किंचीत कमी होत चालले आहे. कमाल तापमान वाढुन ४५ अंशापर्यंत नोंदविले गेले होते परंतु आता ते कमी होऊन ४० अंशापर्यंत नोंदविले गेले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाराच्या पातळीत घट झाली याचे कारण म्हणजे राज्याच्या काही भागात झालेला तुरळक पाऊस , त्यामुळे तापमान काही अंशी कमी झाले आहे.
तथापि,मराठवाड्यांच्या ब्रम्हपुरी ,चंद्रपूर आणि परभणी सारख्या ठीकाणी अजुनही तापमान उष्णनच आहे . कोकण आणि मध्य महाराष्ट्र विभागात पारा पातळी ३० अंशाच्या च्या वर नोंदविले गेले आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भागामध्ये कमाल तापमान जास्त आहे.
स्काय मेट वेदर च्या दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, १६ मे च्या संध्याकाळी, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस होऊ शकतो.
[yuzo_related]
त्याचप्रमाणे नागपूर, नाशिक, पुणे, अकोला, सोलापूर, वेंगुर्ला, रत्नागिरी, वाशिम, कोल्हापूर व सांगली याही ठिकाणी पाऊस होऊ शकतो . दुसरीकडे,उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे ,अलिबाग या ठिकाणी हवा कोरडी राहील. हा पाऊस होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ज्यामुळे वारे उत्तर पश्चिम राजस्थान कडून पश्चिम मध्य प्रदेश ओलांडून मध्य महाराष्ट्राकडे वाहत आहेत.
हवामानाचा महाराष्ट्र कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;
शेतकरी बांधवाना सल्ला आहे की उष्णतेचा जोर लक्षात घेऊन सर्व पिकांना दर ६ दिवसांनी पाणी द्यावे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी संत्रा आणि आंबा या फळबागानां सकाळी किंवा संध्याकाळी पानी दयावे. त्याचप्रमाणे उन्हाळी पिके काढुन वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावी . राज्यात हलकासा पाऊस होऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनी काढलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
Image Credit:
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.