जून महिन्यात झालेल्या उत्तम पावसानंतर जुलै महिन्यात मात्र मुंबईत अगदीच कमी पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षातील जुलै महिन्याचा मुंबईतील पाऊस बघता यंदा मात्र सर्वात कमी पाऊस झालेला आहे. जून महिन्यातील रेकॉर्ड ब्रेकिंग पावसामुळे मुंबईचा जुलै महिन्याच्या पावसाची भर तशी निघाली आहे. पण मासिक सरासरीपासून मात्र पावसाची नोंद काहीशी दूर आहे.
गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मुंबईत २६५ मिमी पावसाची नोंद झाली असून हि नोंद मासिक सरासरी पावसाच्या नोंदीपेक्षा ६७% कमी आहे. सर्वसाधारणपणे मुंबईत जुलै महिन्यात ८०० मिमी पाऊस होतो. भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार जरी मुंबईत येते काही दिवस अधूनमधून हलका पाऊस पडला तरी मुंबईसाठी जुलै महिना हा कोरडाच होता असे म्हणावे लागेल.
जुलै महिन्याच्या सुरवातीचे २० दिवस मुंबईसाठी कोरडेच गेल्यामुळे तेथील नागरिकांना गरमी आणि उकाड्याचा सामना करावा लागला कारण पाऊस न झाल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंश से. ने वाढ झाली आहे. जून महिन्यात १००० मिमी पावसाची नोंद झाली आणि जुलै महिना मात्र कोरडाच गेला हि बाब खिन्न करणारी नक्कीच आहे.
सर्वसाधारणपणे जुलै महिना हा मुंबईसाठी सर्वात जास्त पावसाचा असतो. काही काही वेळा तर खूपच पावसाची नोंद झालेली आहे, २००५ या वर्षात तर १४५४ मिमी पाऊस झाला होता आणि गेल्या वर्षीपण १४६८ मिमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरात एकही हवामान प्रणाली सक्रीय नसल्याने मुंबईत हवा तसा पाऊस झाला नाही.
Image credit: Indiatoday