सर्वसाधारणपणे जुलै महिना हा मुंबईकरिता भरपूर पावसाचा असतो आणि शहरात साधारणतः ८०० मिमी पाऊस होतो. यंदा नैऋत्य मान्सूनने मुंबईत सुरुवातीला उशिरा हजेरी दिली आणि दहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जोरदार सुरुवात झाली. यानंतर मात्र जून महिन्यात मुंबईत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंतच्या सर्वात जास्त असलेल्या १९७१ सालच्या (१०३७.१ मिमी) नोंदीचे रेकॉर्ड ब्रेक केले.
आणि आता जुलै महिन्यातही जून सारखाच पाऊस होईल असा अंदाज आहे.आतापर्यत शहरात ६.५ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यातील ६ मिमी पाऊस हा एका दिवसात झालेला आहे. गेल्या २४ तासात शहरात फक्त ०.३ मिमी पाऊस झालेला आहे.
मुंबईतील पावसाचे एक तंत्र आहे ते म्हणजे थोड्या दिवसाच्या पावसानेच तेथील मासिक सरासरी भरून निघते. मुंबईतील मान्सूनचा पाऊस पुढील दोन बाबींवर अवलंबून असतो
- बंगालच्या उपसागरातील प्रणाली सक्रीय होऊन त्याचा परिणाम किनारपट्टीजवळील क्षेत्रावर होतो.
- समुद्रावर तयार झालेली हवामान प्रणाली जेंव्हा जमिनीकडे सरकते आणि महाराष्ट्राच्या आणि लगतच्या मध्याप्रदेशावर त्याचा परिणाम होतो.
मुंबईतील मान्सूनच्या हवामानाचा अंदाज
सध्यस्थितीत किनारपट्टीजवळ एकही सक्रीय हवामान प्रणाली दिसलेली नाही. स्कायमेट या संस्थेनुसार मुंबईत पाऊस देणारी समुद्राकडून जमिनीकडे येणारी हवामान प्रणालीही सध्या दिसलेली नाही. मुंबई शहरात येत्या आठवड्यात तुरळक पाऊस होईल. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात चांगलाच पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील तापमान
मुंबईत सध्या दिवसाचे कमाल तापमान ३० अंश से. असून किमान तापमान २५ अंश से. आहे. फारसा पाऊस होत नसल्याने पुढचा आठवडा गरमी आणि आर्द्रतेचा असेल. दुपारची वेळ तशी असह्य करणारी असेल कारण कमाल तापमान थोडे जास्त होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
Image Credit: NDTV