दक्षिण-पश्चिम मॉन्सून २०१९ चे आगमन अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर झाले आहे. मॉन्सूनने दोन दिवस आधीच येऊन, दक्षिण अंदमान सागर आणि दक्षिण बंगालच्या खाडी व निकोबार द्वीपसमूहापासून आपला प्रवास सुरु केला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण अंदमान सागरावर बनलेली आहे. याशिवाय, द्वीपसमूहावर दक्षिण पश्चिम दिशेने वारे वाहत आहे ज्यामुळे, येथे ढगाळ आकाशासह पावसाची सुरुवात झाली आहे.
सुरवाती पावसाचा जोर अपेक्षांनुसार कमीच राहिलेला आहे. परंतु, आमची अशी अपेक्षा आहे की पावसाच्या तीव्रतेत आता लक्षणीय वाढ दिसून येईल.
मॉन्सूनची उत्तर सीमा (एनएलएम) सध्या अक्षांश 5 ° उत्तर / रेखांश 81 ° पूर्व, अक्षांश 7 डिग्री उत्तर / रेखांश 88 ° पूर्व, कार निकोबार आणि अक्षांश 13 ° उत्तर / रेखांश 99 ° पूर्व आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात, दक्षिण पश्चिम मॉन्सूनची आणखी प्रगती होणार व मॉन्सूनचा प्रभाव उत्तर अंदमान सागर, अंदमान द्वीपसमूह व बंगालच्या खाडीच्या दक्षिण भागांवर दिसणार.
Also read in English: Journey of Southwest Monsoon 2019 begins as it makes onset over Andaman and Nicobar Islands
तथापि, केरळला मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल. स्कायमेटने आधीच यावर्षी ४ जूनच्या सुमारास (+/- २ दिवसांच्या त्रुटीसह) मॉन्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज दिला आहे. हवामानज्ञांच्या मते, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर मॉन्सूनच्या आगमनाचे, केरळवर मॉन्सूनच्या प्रारंभाशी मात्र कोणताही संबंध नाही आहे.
केरळवर मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा करण्याचे तीन निकष आहेत, ज्यापासून मॉन्सून चार महिन्यांच्या लांब प्रवासावर निघतो.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे