[Marathi] भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यादरम्यान पावसामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता ?

October 11, 2019 11:23 AM | Skymet Weather Team

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरूच आहे. काल शहराच्या बर्‍याच भागात गडगडासह मध्यम पाऊस नोंदला गेला. दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात असून त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात अडथळा येण्याची दाट शक्यता आहे.

हवामानतज्ञांच्या अनुसार, ढगांच्या विकासामुळे शहरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत या गतिविधींची शक्यता आहे, दुपारनंतर, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक नसून कमी कालावधीसाठी असणार आहे.

हवामान प्रणालींविषयी सांगायचे तर, एक कमी दाबाचा पट्टा कोमोरिनपासून गोव्याच्या किनारपट्टीलगतच्या मध्य-पूर्व अरबी समुद्रापर्यंत विस्तारत आहे, तसेच गुजरात व कर्नाटकपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला असून त्यासोबत चक्रवाती अभिसरण देखील आहे. या सर्व हवामान प्रणालींसह विकसित होणाऱ्या ढगांमुळे पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहील.

त्यानंतर, ह्या प्रणाली कमकुवत होतील आणि त्यामुळे संपूर्ण प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी होईल आणि त्यानंतर केवळ तुरळक सरींची शक्यता आहे.

दरम्यान परवा पुण्यात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे बहुतांश भागात वाहतुकीची कोंडी झाली होती आणि काही भागात पाणी साचले होते. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असेलेल्या पीएमपीएमएलच्या सर्व्हिस वाहनावर झाड उन्मळून पडल्याने एका बसचालकाचा मृत्यू देखील झाला आहे.

Image Credits – Sportscafe 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES