[Marathi] मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये हवामान कोरडे राहील; भाज्यांना गरजेनुसार पानी दयावे.

April 23, 2018 2:00 PM | Skymet Weather Team

गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे हवामान कोरडे आहे,असे असूनही राज्याच्या काही भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्रातील तापमान मधे गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे, तर विदर्भातील काही भागामध्ये उष्णतेची लाट आली असून कमाल तापमान ४४ अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.

रविवारी ब्रम्हपुरी येथे देशातील सर्वात जास्त कमाल तापमानाची ,म्हणजेच ४४. ३ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर त्याच्या बरोबर असलेल्या चंद्रपूरमध्ये ४४. २ अंशापर्यंत तापमान वाढले. नागपूर आणि अकोला या दोन्ही शहरात कमाल तापमानाची ४२. ५ एवढी नोंद झाली.

मराठवाडा व कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही क्षेत्रांमध्ये कमाल तापमान थोडे कमी होऊन सामान्य तापमानाच्या जवळ येत आहे. तसेच किमान तापमान २ ते ३ अंशांनी कमी होत आहे . दरम्यान, नाशिक येथे ३८ अंश , कोल्हापूर ३८. ८ अंश , पुणे ३८. १, मुंबई ३६. १ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. डहाणू, महाबलेश्वर आणि अलिबाग येथे दिवसभरात प्रत्येकी ३४ अंश कमाल तापमान नोंदवले गेले.

[yuzo_related]

स्काय मेट अंदाजानुसार सध्या हवामानामध्ये कोणताही लक्षणीय बदल नसेल. राज्यातील हवामान कोरडे राहील असे अपेक्षित आहे.कमाल तापमान सामान्य जवळ राहील.

हवामानाचा महाराष्ट्राच्या कृषीवर होणारा परिणाम पाहू;

सध्याचे हवामान पाहता शेतकरी बंधूना सल्ला देण्यात येत आहे कि त्यांनी उन्हाळी पिकांची काढणी पूर्ण करावी ,फळे व भाज्यांना पानी द्यावे . विदर्भातील काही भागात अजूनही उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती चालु आहे ,म्हणून, शेतकरी मित्रांनी उन्हाळी सूर्यफूल कापणी करावी,  जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी गवताचे आच्छादन (मल्चिंग)करावे.

Image Credit: Wikipedia

येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे.        

 

 

OTHER LATEST STORIES