[Marathi] महाराष्ट्रात तीव्र उष्णतेचा वाढता आलेख ; उन्हाळी पिकांना पानी दयावे

April 25, 2018 2:39 PM | Skymet Weather Team

गेल्या खुप दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये गरम व कोरडे हवामान अनुभवण्यात येत आहे . विदर्भ आणि मराठवाडा हे दोन विभाग आहेत जे गहन उष्णतेच्या प्रभावाखालीं आहेत. विदर्भातील काही भागांमधे पाऱ्याचे प्रमाण सतत वाढते असुन ते ४० अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार सध्या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये कोणताही लक्षणीय बदल अपेक्षित नाही. उष्ण आणि कोरडे वादळ व वारे दक्षिण राजस्थान आणि बलुचिस्तानातील भागाकडून उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भकडे वाहत आहे ज्यामुळे कमाल तापमान ४०अंशापर्यंत व त्यापेक्षा जास्त नोंद होत आहे.

[yuzo_related]

या वादळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान वाढुन उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, परभणी, चंद्रपूर, अकोला, ब्रम्हपुरी, वर्धा, नांदेड , जळगाव सारख्या ठिकाणी हवामान उष्ण राहील. मंगळवारी, परभणी येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची ४४. १ अंश एवढी नोंद झाली. दरम्यान चंद्रपूर येथे ४३. ९, ब्रम्हपुरी ४३. ७, अकोला ४३.३, वर्धा ४३. २ नांदेड ४३ अंश आणि जळगाव येथे ४२. ९ अंश एवढी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, कोकण विभागाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहील आणि ते ३०अंशापेक्षा जास्त नोंदविले जाईल. तथापि, सागरी किनारपट्टी प्रदेश असल्याने, हवामान गरम आणि असह्य असेच राहील.

तसेच सागरी किनारपट्टीजवळील भागात म्हणजे मुंबई, डहाणू, रत्नागिरी , महाबळेश्वर या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहील.आभाळ सतत स्वछ तेजस्वी सुर्यप्रकाश देणारे असल्यामुळे गरम आणि कोरडे हवामान कमी होण्याचे लक्षण नाही.  त्यामुळे, सध्या चालू असलेल्या गरम हवामान पासून कोणताही दिलासा मिळणार नाही.

महाराष्ट्र कृषी पट्टयांवर होणारा हवामानाचा होणारा परीणाम पाहू;

प्रखर उष्णता बघता शेतकरी बंधूंनी उन्हाळी पिकांना पानी द्यावे . (भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मूग इ). भाजीपाला पिकांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 6 ते 7 दिवस दिवसाच्या अंतराने पाणी घालावे.मध्य महाराष्ट्र मधील शेतकरी मित्रांनी लिंबूवर्गीय फळभागामध्ये उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी वारंवार सिंचन व मल्चिंग करावे.

पिके / फळबागा यांना खत घालणे टाळावे. कोकण मधील शेतकरी बंधुनी ८० ते ८५% पिकलेल्या आंब्याची काढणी सकाळी आणि संध्याकाळी करावी. रोग टाळण्यासाठी आणि उष्णता पासून संरक्षण करण्यासाठी फळ साठवण सावली मध्ये करावीं.

Image Credit: Deccan Chronicle

येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे.     

 

 

OTHER LATEST STORIES