[Marathi] चंद्रपूर, अकोला मधे अजुनही उष्णतेची लाट कायम; मका पिकाला सिंचन करा

April 24, 2018 1:57 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील बहुतेक भागांचे तापमान वाढतच आहे आणि वाढत्या पाराच्या पातळीत बदल होण्याचे चिन्ह दिसत नाही. विदर्भातील काही भागामध्ये स्थान अजूनही उष्णतेची लाट कायम आहे . दरम्यान, राज्याच्या इतर भागामध्ये ४० अंशापर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे सोमवारी हवामान खुप उष्ण होते,व कमाल तापमान ४४. ५ अंश आणि ४४. ३ अंश इतके होते. विदर्भातील इतर भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येत आहे, त्यात अकोला आणि वर्धा हे सामील असुन तेथील कमाल तापमान ४३ अंश नोंदविले गेले.

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा इतर विभागमधे देखील कमाल तापमान ३० अंशाच्या वर ४० अंशापर्यंत नोंदविले गेले.दरम्यान नाशिकमध्ये कमाल तापमान ३८. ८ अंश, कोल्हापूर ३७. ५ अंश , पुणे ३९. ४ अंश,  मुंबई ३४. २ अंश,  डहाणू ३५. ३ अंश,  अलिबाग ३४. ५ अंश,  सांगली ३९.६, एवढी कमालतापमानाची नोंद झाली आहे.

[yuzo_related]

स्काय मेटच्या हवामान अंदाजानुसार नुसार, राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे.विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची अपेक्षा आहे , तापमान वाढुन ते ३७ ते ३८ अंशापर्यंत जाऊ शकते.

तथापि,पाऊस पुढील २४-४८ तासात विदर्भ आणि शेजारच्या महाराष्ट्र भागात गडगडाटी वादळ व हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस कमी दाबाच्या पट्टयांमुळे होईल ज्यामुळे ओडिशातील वारे विदर्भ ओलांडून दक्षिण केरळ कडे जातील ,यामुळे हवेतील ओलावा काही भागामध्ये वाढु शकतो याचा परिणामनांदेड, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या भागांवर होईल.

कृषी घटकावर हवामानाचा होणारा परीणाम;

वाढता उन्हाळा पाहता शेतकरी बंधुनी शक्यतो सकाळी १० च्या आधी आणि संध्याकाळी ४ वाजलें नंतर फळे काढणी सुरु करावी. फळे वाहतूक रात्री केली पाहिजे. उष्णतेची लाट असल्याने, शेतकरी मित्रानी सिंचन व्यवस्थापन करावे, सहा दिवसांच्या अंतराने मका पिकाला पानी द्यावे. वाढत्या तापमाचा परिणाम होऊ नये म्हणुन लिंबूवर्गीय फळांना पानी दयावे आणि मल्चिंग करावे . पिकांच्या कापणी नंतर, लगेच पडीक जमिनी मध्ये जमिनीची खोल नांगरणी केली पाहिजे. 

Image Credit: trust.org

येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे.        

 

 

OTHER LATEST STORIES