[Marathi] अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी मधे पुन्हा एकदा उष्णतेची लाट उसळली; पिकांना वारंवार पानी दयावे.

May 7, 2018 3:53 PM | Skymet Weather Team

स्काय मेट वेदर च्या दिलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील काही भागात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस गेले काही (१ ते २)दिवस पडत आहे.

रविवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून पुढील २४ तासात ब्राह्पूपुरीमध्ये १० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तर, वर्धा येथे ८. २ मिमी, सांगली ४मिमी, कोल्हापूर १. ४ मिमी आणि वेंगुर्ला येथे ही तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

या पूर्व मौसमी पाऊसामुळे कमाल तापमानामध्ये थोडाही उतार झालेला नाही ,उलट गेल्या २४ तासात तापमान जास्ती उष्ण होते . पाराच्या पातळीत झालेली वाढ यामुळे विदर्भाच्या काही भागात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी ब्रह्मपुरी, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी कमाल तापमानाची अनुक्रमे ४५. १,४५.१ व ४४. ६अंश एवढी नोंद झाली असुन हे कमाल तापमान एक प्रकारे उष्णतेच्या लाटेचे साक्ष आहेत.शिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती अनुभवण्यात आली, परभणी,  नांदेड,  सोलापूर येथे अनुक्रमे ४४, ४३,४२. ६ अंश अशी कमाल तापमाची नोंद झाली.

[yuzo_related]

तसेच मालेगाव व औरंगाबाद येथे कमाल तापमान ४४. ४ व ४१. ६ अंश एवढे होते . कोकण बद्दल बोलायचे झाले तर किमान तापमान ४०अंशाच्या खाली असुन सामान्य तापमानापेक्षा किंचित जास्ती आहे ,परंतू सागरी किनारा जवळ असल्याने तेथील हवामान कोरडे व थोडे उबदार असे आहे.

स्काय मेट च्या हवामान अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले वारे सध्या छत्तीसगडाकडून विदर्भ आणि मराठवाडा ओलांडून कर्नाटकच्या सागरी किनार पट्टीकडे वाहत आहेत.

या पार्श्वभूमीवर,येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाडयाच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मध्य महाराष्ट्र च्या काही भागांमध्ये आज संध्याकाळी मेघगर्जना होऊ शकते . दुसरीकडे, कोकणमधे हवामान कोरडे आणि दमट राहील.

हवामानाचा महाराष्ट्र कृषी पट्ट्यावर होणारा परीणाम पाहू:

विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अति उष्णता असल्या कारणाने शेतकरी बंधूंना सल्ला आहे कि त्यांनी उन्हाळी पिके, फळभाज्या(टोमॅटो ,वांग ,भेंडी ) यांना वारंवार पानी द्यावे. जमिनीचा ओलावा टिकवुन ठेवण्यासाठी मल्चिंग (आच्छादन)करावे.

हलकासा पाऊस होऊन गेला आहे त्यामुळे काही रोग ,कीड पडू नये म्हणुन शेतकरी बांधवानी फवारणी करून घ्यावी. नव्याने लागवड केल्याला आंब्याच्या रोपाला आधार द्यावा. तसेच परिपक्व आंबा काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी असा सल्ला आहे.तसेच शेतकरी बांधवानी खरीप भुईमूग, मका, काळा हरभरा, तूर व सोयाबीन पेरणीसाठी जमीन(रान) तयार करण्यास सुरवात करावी.

Image Credit: DNA India

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे. 

OTHER LATEST STORIES