[Marathi] IOD आणि MJO मुळे घटत असलेला एल निनो निष्प्रभ झाल्याने मान्सूनचा चांगला पाऊस

August 23, 2019 5:23 PM|

El Nino and Monsoon

या मोसमात मान्सूनमध्ये खूप चढउतार आले. हंगामाच्या सुरूवातीच्या जून महिन्यात जवळपास दुष्काळसदृश स्थिती आणि ऑगस्टमध्ये पूर परिस्थिती. हवामानाच्या परिस्थितीत झालेल्या या कमालीच्या परिवर्तनाचे श्रेय आयओडी(इंडियन ओशन डीपोल) तसेच एमजेओ (मॅडन-ज्युलियन ऑसीलेशन)या सागरी घटकांना दिले जाऊ शकते.

पुनरावृत्ती केल्याप्रमाणे, सकारात्मक आयओडी आणि हिंद महासागरातील एमजेओची उपस्थिती मान्सूनच्या चांगल्या पावसास कारणीभूत ठरते. एकत्रितपणे, त्यांच्यात अगदी अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे सामर्थ्य आहे. जे यावर्षी मान्सूनच्या बाबतीत घडले आहे.

एल निनो घटत्या अवस्थेत असल्याने आणि आयओडी व एमजेओ दोन्ही मजबूत आणि अनुकूल टप्प्यात असल्याने, जुलै अखेर पावसाने दमदार वळण घेतले.

अपेक्षेप्रमाणे, विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात (एसएसटी) सतत चढउतार होत असताना एल निनोने जुलैमध्येच घसरता कल दर्शविण्यास सुरुवात केली होती. मूल्ये घटल्यानंतरही, एसएसटीत पुन्हा वाढ झाली होती परंतु त्यानंतर लवकरच घट व्हायला सुरुवात झाली आणि, सलग तिसर्‍या आठवड्यात, एसएसटीमध्ये घसरण सुरू आहे. खरं तर, चालू आठवड्यात लक्षणीय घसरण दिसून आली ज्यामध्ये एसएसटी ०.४ अंश सेल्सियसवरून ०. १ अंश सेल्सियस पर्यंत खाली आले आहे.

El-Nino-Index-2

हवामानातज्ञांच्या मते, हा चढ-उतार एल निनोचे पतन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. हा घातक घटक आता तटस्थ होण्याच्या जवळ येत आहे. तटस्थ परिस्थिती घोषित करण्यासाठी, ओशॅनिक निनो इंडेक्स (ओएनआय) नुसार निनो-३.४ प्रदेशातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विसंगती सलग तीन महिन्यांपर्यंत ०.५ अंश सेल्सियसच्या उंबरठ्या खाली स्थायिक झाली पाहिजे.

आतापर्यंत, ओएनआय मूल्ये गेल्या सलग नऊ महिन्याच्या अवधीसाठी सामान्य सरासरीच्या वर आहेत. परंतु गेल्या दोन भागांमध्ये ओएनआय मूल्ये कमी होण्याचा कल देखील दर्शवित आहेत. अशाप्रकारे, आता आम्ही आशा करतो की जून-जुलै-ऑगस्टच्या पुढील भागात आवश्यक तापमान ०.५ अंश सेल्सियसपेक्षा कमी होईल.

ONI-Values-2-768x47

हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार,एल निनोची परिस्थिती साधारणत: ९-१२ महिने टिकते आणि आपण आतापर्यंत नऊ भाग समान पाहिले आहेत. सूर्याच्या सानिध्यात असल्यामुळे विषुववृत्तावरील प्रशांत महासागरातील तापमानवाढ होवून मार्च ते जून या कालावधीत विकसित होऊन डिसेंबर व एप्रिल दरम्यान शिखरावर असतो. सध्या, एल निनो काळ अनुकूल क्षेत्रामध्ये नसून आता संकुचित होण्याच्या दिशेने जात आहे.

सध्या एल निनोची केवळ ३०% संभाव्यता असून पुढे मार्गक्रमण करत असताना त्यात घट होणार आहे.

दुसरीकडे, आयओडी खूप सकारात्मक आहे आणि गेल्या काही महिन्यांत मजबूत होत आहे. खरं तर, एमजेओ दोन वेळा हिंदी महासागरात येऊन गेला आहे आणि जोर पण जास्त होता. परिणामी, जुलैअखेरपासून पावसाने जोर धरला होता. २३ ऑगस्टपर्यंत, देशभरात मोसमातील मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १% जास्त आहे.

आता एल निनो ला निरोप द्यायची वेळ आली असून तो आता तटस्थ दिशेने मार्गक्रमण करत आहे. हवामानतज्ञांच्या अनुसार, एल निनोचा आता मान्सूनच्या पावसावर किमान परिणाम होईल. ऑगस्टमध्ये पावसाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. खरं तर, अतिरिक्त पावसाची नोंद एकदा ४९% पर्यंत पोहोचली होती, तर सध्या म्हणजे २२ ऑगस्ट रोजी ऑगस्टमध्ये २६% जास्त पाऊस झाला आहे.

आयओडी हंगामात राहणार असून, सप्टेंबरच्या अखेरीस एमजेओ पुन्हा हिंद महासागरात येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनची स्वतःची गतिशीलता आणि मदत करणारे घटक आहेत आणि सागरी घटकांच्या अनुपस्थितीत देखील चांगली कामगिरी केली आहे.

हवामान प्रारूपांनी आधीच मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोची परिस्थिती ढेपाळण्याचे संकेत वर्तविले होते. त्यानुसार जून आणि जुलैच्या तुलनेत स्कायमेटने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता.

Image Credits – The Atlantic 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles

thumbnail image
होली पर कैसा रहेगा मौसम? जानिए दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा समेत कई शहरों का मौसम पूर्वानुमान

रंगों के त्योहार होली पर मौसम का मिजाज अलग-अलग शहरों में भिन्न रहेगा। कुछ जगहों पर हल्की बारिश की संभावना है, तो कुछ शहरों में चटख धूप खिली रहेगी। आइए जानते हैं दिल्ली, मुंबई, जयपुर, पटना, मथुरा, हरियाणा, केरल और उत्तराखंड के लिए होली का मौसम कैसा रहेगा।

posted on:
thumbnail image
पश्चिमी विक्षोभ लगातार सक्रिय, हिमालयी राज्यों में बारिश और बर्फबारी की चेतावनी

इस बार मार्च में भी पश्चिमी विक्षोभ सक्रिय बना हुआ है, जिससे पहाड़ी और मैदानी क्षेत्रों दोनों में प्रभाव देखने को मिलेगा। जहां हिमालयी राज्यों में बर्फबारी की कमी दूर होगी, वहीं उत्तर भारत के किसान ओलावृष्टि और बारिश के कारण सतर्कता बरतने की जरूरत होगी।

posted on:
thumbnail image
Series of Western Disturbances to Bring Rain and Snow to Western Himalayas

Heavy rain and snowfall is likely over the Western Himalayas for the next few days. Northern plains, including Punjab, Haryana, Delhi and parts of Rajasthan, may see scattered rain during Holi (March 14), with a chance of isolated hailstorms. Farmers should stay alert, as hail could impact standing crops.

posted on:
thumbnail image
[Hindi] सम्पूर्ण भारत का मार्च 12, 2025 का मौसम पूर्वानुमान

अगले 24 घंटे के दौरान सिक्किम, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, नागालैंड, अंडमान और निकोबार द्वीपसमूह, केरल और लक्षद्वीप में हल्की से मध्यम बारिश और गरज के साथ बौछारें पड़ सकती हैं।सिक्किम और उत्तराखंड में भी हल्की बारिश और बर्फबारी हो सकती है। तमिलनाडु और पंजाब में हल्की बारिश होने की संभावना है।

posted on: