यंदाच्या मान्सूनमध्ये कर्नाटकात पावसाची कमतरता निर्माण झाली आहे. फक्त जून महिन्यात मात्र दक्षिण कर्नाटकातील भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता आणि उत्तर कर्नाटकात आणि मध्य कर्नाटकात मात्र सरासरी इतकाच पाऊस झाला होता.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात उत्तर कर्नाटक आणि मध्य कर्नाटक हे भाग कोरडेच होते. सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत या भागात फारसा पाऊस झालेला नाही. तसेच दक्षिण कर्नाटकात मात्र पावसाने सामान्य पातळी गाठली आहे. सध्या या भागात १३% कमी झालेला आहे.
गेल्या २४ तासात राज्यातील बऱ्याच भागात चांगला पाऊस झालेला आहे. उत्तर कर्नाटकात सध्या ४०% कमी पाऊस झालेला असून गेल्या २४ तासापासून येथे चांगलाच पाऊस सुरु आहे. रविवार सकाळी ८.३० पासून ते सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत रायचूर येथे ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच चित्रदुर्ग येथे ६६ मिमी आणि बिजापूर येथे ४२ मिमी व गदग येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दक्षिण कर्नाटकातील भागातही चांगला पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मडिकेरी येथे ६१ मिमी तसेच राज्याची राजधानी बंगरूळ येथे ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाडा ते लक्षद्वीप पर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कर्नाटकातून पुढे जात असल्याने या भागात चांगलाच पाऊस सुरु आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या राज्यात येत्या २ ते ३ दिवसात असाच चांगला पाऊस सुरु राहील.
कृषिक्षेत्राच्या दृष्टीने हा पाऊस चांगलाच लाभदायक ठरणार आहे. कारण या पावसामुळे जलसाठे भरण्यास मदत तर होईलच त्याचबरोबर जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होईल.
Image Credit: indiatvnews.com