[Marathi] मुंबई मध्ये मॉनसून जोर धरणार, २७ ते २९ जून दरम्यान २०० मि.मी. पावसाची शक्यता

June 26, 2019 10:26 PM | Skymet Weather Team

बऱ्याच लपंडावानंतर, मुंबई मध्ये मॉनसूनने जवळपास पंधरवड्याच्या विलंबाने सुरुवात केली. पण सुरुवात हि अत्यंत मंद होती आणि केवळ ०. ६मिमी पावसाची नोंद झाली.

सामान्यतः मुंबई मध्ये मॉनसून ची सुरुवात जोरदार पावसाने होते. मुंबई मध्ये पावसाचा लपंडाव २० जून पासून सुरु असून शहरात फक्त १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

परंतु आता मुंबईत पाऊस पुन्हा जोर धरेल आणि जवळपास संपूर्ण शहरात पाऊस पडेल.

स्कायमेटनुसार, सक्रिय मान्सूनमुळे पश्चिम किनाऱ्यालगत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे. याव्यतिरिक्त,पूर्व-मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. यामुळे पुढील३-४ दिवसांच्या काळात मुंबईत अतिशय जोरदार पावसाची नोंद होईल. मुंबईकर २७ जून ते २९ जून च्या दरम्यान २०० मि.मी.इतका पाऊस अनुभवू शकतात.

हवामानतज्ञांच्यानुसार, आज रात्रीपासून पावसात वाढ होईल आणि त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढेल. पावसाचा जोर वाढून २७ जूनच्या संध्याकाळपासून मुंबई मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत जूनमध्ये आतापर्यंत ४९३ मिमी सरासरी पावसाच्या तुलनेत फक्त २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपण्यास फक्त चार दिवस बाकी असताना लक्ष्य थोडे कठीण असले तरी अशक्य नाही.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES