Skymet weather

[Marathi] आपल्या घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी १० परिपूर्ण वायु शुद्धीकरण करणारी रोपं

November 27, 2019 8:19 AM |

air purifiers

जवळजवळ प्रत्येक तिसर्‍या दिवशी दिल्लीत प्रदूषण शिगेला पोहोचत असून आपल्याला आणि आपल्या कुटुंबास थोडीशी ताजी स्वच्छ हवा श्वास घेण्यास मदत करणारी प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. बाहेरील हवा प्रदूषित असतांना देखील कमी देखभाल लागणाऱ्या, सुंदर रोपांच्या मदतीने आपण आपल्या घरातील हवा स्वच्छ आणि शुद्ध सहजपणे ठेवू शकता:

फ्लेमिंगो लिली आपल्या दिवाण खान्यामध्ये आवश्यक रंगसंगतीत भर घालते आणि सर्वात चांगला भाग म्हणजे वर्षभर फुले असतात. आपल्या खोलीला फॉर्मलडीहाइड, अमोनिया, झाइलिन आणि टोल्युएन या प्रदूषकांपासून सहजपणे मुक्त करू शकता.

चिनी सदाहरित रोप लावण्यास एक सर्वात सोपे रोपटे आहे आणि आपल्या घराला फॉर्मलडीहाइड आणि झाइलिनपासून मुक्त करण्यात मदत करू शकते. ते दमट, कमी प्रकाश असलेल्या जागेत देखील चांगले वाढतात आणि त्यांना दररोज पाणी घालण्याची देखील गरज नाही.

अरेका पाम हानिकारक बेंझिन, कार्बन मोनोऑक्साइड आणि फॉर्मल्डिहाइड सहजतेने शोषू शकते आणि आपल्या घरांना प्रदूषित हवेपासून मुक्त ठेवू शकते. आपण हे रोप टेबल टॉप आकारात असताना खरेदी केल्यास फायद्याचे आहे.

डेंड्रोबियम फॅलेनोपसिस हे सुंदर ऑर्किड्स आहेत जे झाइलिन दूर ठेवतील आणि आपले घर देखील सुंदर दिसेल. आपली हवा केवळ बाहेरून हानिकारक रसायनांनीच प्रदूषित होत नाही तर पेंट आणि गोंद पासून बनलेल्या झाइलिनमुळे देखील होते.

बोस्टन फर्न हे आपल्या घराला झाइलिन, बेंझिनपासून मुक्त ठेवण्यासाठी आणि फॉर्मल्डेहायड चांगल्यारीत्या शोषून घेणारे सर्वात चांगले रोप आहे. बेंझिन हे गॅसोलीन अपशिष्ट वायूमध्ये आढळते. आपल्याला आठवड्यातून एकदाच त्यांना पाणी देण्याची गरज आहे, म्हणूनच म्हणतात कि या रोपाचा कोणताही त्रास नाही, नाही का?

नासाने स्पायडर प्लांटची शिफारस केली आहे. ते केवळ कार्बन डायऑक्साईडच नव्हे तर फॉर्माल्डिहाइड आणि हवेतील इतर विषारी पदार्थांना शोषून घेण्यास मदत करतात. आपल्याला त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही, परंतु फक्त त्यांना नियमितपणे पाणी द्यावे लागते.

सर्प रोपटे, जे मदर-इन-लाॅ-टंग म्हणून देखील ओळखल्या जाते, सुमारे १०७ प्रदूषकांना शोषून घेण्यासाठी प्रसिध्द आहेत ज्यात कार्बन मोनोऑक्साइड, क्लोरोफॉर्म, झाइलिन, फॉर्मल्डेहायड, बेंझिन, नायट्रोजन मोनोऑक्साइड आणि ट्रायक्लोराथिलीन यांचा समावेश आहे. आपल्याला या रोपासाठी माळी बनण्याची आवश्यकता नाही आणि सर्वात चांगला भाग म्हणजे त्याला भरपूर पाण्याची देखील गरज नाही. खरं तर, जास्त पाणी देणे चांगले नाही. हे रोप रात्री मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे आपल्या बेडरूममध्ये ठेवावे.

क्रायसॅन्थेमम्स एक सुंदर आणि रंगीबेरंगी हवा शुद्ध करणारे रोपटे आहे जे कोणत्याही घरास प्रफुल्लित करू शकते. ते अमोनिया, फॉर्मल्डिहाइड चे निर्मूलन करण्यास मदत करण्यासह बेंझिन देखील दूर ठेवण्यात उपयुक्त आहे. या रोपट्यास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.

वीपिंग फिग हे परिपूर्ण हवा शुद्धीकरण करणारे रोप असून फॉर्मल्डेहायड, ट्रायक्लोरेथिलीन आणि बेंझिन शोषून घेऊन हवा शुद्ध करण्यास मदत करते. रोपट्याला फारच कमी निगराणीची आवश्यकता आहे, परंतु सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

नासाच्या अनुषंगाने इंग्लिश आयव्ही हे हवा शुद्धीकरण्यात प्रथम क्रमांकाचे इनडोअर रोप आहे. ते फॉर्मल्डेहायड आणि बेंझिन शोषून घेते. जास्त पाणी देण्याची देखील गरज नसते.

Image Credits – Prana Air 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try