Skymet weather

[Marathi] आगामी २४ तासांत चक्रीवादळ कायर भारतास प्रभावित करणार

October 24, 2019 2:38 PM |

Cyclone Kyarr

मध्य-पूर्व अरबी समुद्रावर असलेला कमी दाबाचा पट्टा लवकरच तीव्र होण्याची चिन्हे दर्शवित आहे. ही एक दुर्मिळ प्रणाली आहे जी आता एकाच वेळी कमी दाबाचे क्षेत्र म्हणून पाच दिवस कायम आहे.

किनाऱ्याकडे सरकत असताना सर्वांचे डोळे या प्रणालीकडे लागून राहिले आहेत. ही प्रणाली प्रथम तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात आणि नंतर लवकरच चक्रीवादळाचे रूप घेईल ज्याला ‘कायर’ असे नाव देण्यात येईल.

हवामान प्रारूपांच्या अनुसार, सध्या ही प्रणाली व्यापक आहे, जी लवकरच ‘चक्रीवादळा’ मध्ये रूपांतरित होवू शकते. आत्तापर्यंत, चक्रीवादळाची निर्मिती कधी होईल याबद्दल प्रारूपांमध्ये एकमत झाले नसून सध्या ही प्रणाली मुंबईच्या नैऋत्य दिशेला ४५० किमी अंतरावर आहे.

पुढच्या २४ तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून आसपास चा प्रदेश प्रभावित होण्याची अपेक्षा आहे.

सुरुवातीस, हि हवामान प्रणाली ईशान्य दिशेने जाण्याचा अंदाज वर्तविला असून मार्गक्रमण करत असताना वळून पश्चिमेकडे जाईल.

आत्तापर्यंत, "कायर" चा थेट भारतीय मुख्य भूभागावर कोणताही परिणाम होणार नाही. तथापि, कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवरील मंगलोर ते कारवार तसेच कोकण आणि गोव्यापर्यंत कायर चा प्रभाव जाणवेल.

दाट ढग, पाऊस, गडगडाटी वादळे आणि जोरदार वारा यांचा पुढील ४८ तास भूभागावर परिणाम जाणवेल, त्यानंतर धोका कमी होण्यास सुरवात होईल.

बहुतेक हवामान प्रारूपांच्या संकेतानुसार हे चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तथापि, चक्रीवादळ कराचीच्या किनाऱ्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Image Credits – Hindustan Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try