सध्या मुंबईकर या मोसमातील कमाल तापमान आणि त्याबरोबरच कमाल आर्द्रता यांचा सामना करत असून उष्णता आणि उकाडा यामुळे हैराण झालेले आहेत.
दिवसाचे कमाल तापमान ३० अंश से. किंबहुना त्यापेक्षा जास्तच असते. मंगळवारी मुंबईत कमाल तापमान ३४.५ अंश से. होते म्हणजे या महिन्याच्या मासिक सरासरी (३३.४ अंश से.) तापमानापेक्षा जास्त नोंद झालेली दिसून आली.
मुंबईकरांना हैराण करण्यास फक्त तापमानातील वाढ कारणीभूत नसून वातावरणातील वाढलेली आर्द्रताही आहे. १ ते २ अंश से. ने जरी तापमानात वाढ झाली तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढते आणि त्यामुळे घाम, उकाडा आणि चिकचिक यांना सामोरे जावे लागते. पण दुपारच्या या भयंकर त्रस्त करणाऱ्या उकाड्यापासून संध्याकाळी आणि रात्री समुद्राकाडून येणाऱ्या हवेमुळे थोडासा दिलासा मिळतो.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार येत्या २४ ते ४८ तासात मुंबईत गडगडाटी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
भारतात सर्वत्र वातावरणात काही ना काही बदल घडत असताना मुंबईत मात्र मे महिना दरवर्षीप्रमाणे गरमीचाच आहे. मुंबई किंवा आसपास कोठेही वेगळी हवामान प्रणाली दिसून आलेली नाही. नेहमीप्रमाणेच या महिन्याचा मासिक सरासरी पाऊस १२.५ मिमी आहे. गेल्या आठ वर्षांचा आढावा घेतल्यास, आठ वर्षातील सहा वर्षे मे महिन्यात सरासरी पावसाची नोंद झाली आणि उरलेल्या दोन वर्षात मात्र १ मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झालेली दिसून आली.
मुंबई साठी नेहमीच मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने प्रचंड गरमीचे असतात. पण यातही मे महिन्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात फक्त तापमान जास्त असते.
Image credit : kebhaiadas.com