राजस्थान आणि महाराष्ट्रातील उष्ण लहरीत आता वाढ झाली असून तिची झळ आता मध्यप्रदेशापर्यंत जाऊन पोहचली आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली एनसीआर या राज्यात दिवसाचे तापमान ४० अंश से. पेक्षा जास्तच होते. भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या भागात पुढचे दोन दिवस तरी वातावरणात काहीच बदल होणे अपेक्षित नाही.
आजच्या नोंदीनुसार भारतात राजस्थानातील चुरू येथे कमाल तापमानाची (४६.८ अंश से.) नोंद करण्यात आली.
अशाच कमाल तापमानाच्या आजच्या नोंदी पुढीलप्रमाणे
image credit- ibn live