[Marathi] राज्यातील अनेक भागांवर दिवस व रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक

November 2, 2018 5:42 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील रहिवाशांना कोरड्या हवामाना पासून नोव्हेंबर महिन्यातही सुटका मिळण्याची अपेक्षा नाही.

सध्या,हवामानाची परिस्थिती पाहता , राज्यातील अनेक भागांवर दिवस व रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे.

दरम्यान येणाऱ्या दिवसात दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीपासून मध्य महाराष्ट्र पर्येंत एक ट्रफ रेषा विकसित होणी अपेक्षित आहे ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण- गोवा येथे हलका पाऊस अपेक्षित आहे .

3 नोव्हेंबरच्या आसपास मुंबईकर हलका पाऊस अनुभवतील.शिवाय, 5 नोव्हेंबरच्या आसपास मराठवाडाच्या काही भागांवर हलक्या पाऊसाची शक्यता आहे .परंतु विदर्भाच्या हवामानात कोणताही बदल नसून,कोरडेच हवामान सुरु राहतील .

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश से. आणि किमान 23 अंश से. असण्याची शक्यता आहे. नाशिक मध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पाऊसाची शक्यता असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 15 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पाऊसाची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 33 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. नागपूर येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

Image Credits – Treebo 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES