[Marathi] पॉकेट्समध्ये जोरदार पावसानंतर आता २४ जुलैपर्येंत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही

July 21, 2019 9:08 AM | Skymet Weather Team

बर्याच काळापासून मुंबईत लपलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरात दर्शन दिले आहेत.

खरं तर, शहराच्या बर्याच भागांत जोरदार पाऊस पडला आहे. स्कायमेटच्या एडब्ल्यूएस डेटानुसार, गेल्या २४ तासात किंग्ज सर्कलमध्ये ४० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर कोलाबा येथे २७ मिमी पाऊस पडला आहे. चेंबूर, कांदिवली आणि घाटकोपर येथे दोन अंकी पाऊस झाला आहे.

दुसरीकडे, वाशीने २४ तासांत ५८.६६ मिमी पावसाची नोंद केली आहे तर घनसोलीमध्ये ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बेलापूर आणि सीवूड्समध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

तथापि, पुढील दोन ते तीन दिवसात कोणताही तीव्र पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे आणि काही ठिकाणीच पावसाचे दर्शन होईल. दुसरीकडे, २५ जुलै रोजी मुंबई शहरावर मान्सूनचा प्रभाव वाढेल. खरं तर, २५ जुलै रोजी सुमारे ३०-४० मि.मी. पाऊस होण्याची शक्यता आहे आणि २६ जुलैला १०० मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे पाऊस २५ जुलैला पाऊस वाढू शकतो, जे २६ जुलैला अधिक तीव्रतेने पडेल. २४ जुलैपर्येंत हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील, म्हणजे सुमारे १५-२० मिमी पावसाची नोंद करण्यात येईल.

प्रतिमा क्रेडीट: द स्टेट्समैन

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES