Skymet weather

[Marathi] नाशिक मध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर बुडले, गोदावरी नदी धोक्याच्या वर

August 5, 2019 12:36 PM |

Nashik floods

रविवारी नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २१ तासांत शहरात १३५ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला असून, अद्यापही बर्‍याच भागात सुरू आहे. संततधार पावसामुळे नाशिकचे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर पाण्याने भरले असून मंदिराच्या आवारात पाणी शिरले आहे.

शहरात गेल्या ४८ तासांपासून पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे बर्‍याच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी सूरज मंधारे यांच्या म्हणण्यानुसार, ‘रविवारी महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार सरी बरसल्यामुळे आणि गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने या भागातील गोदावरी नदी धोक्याच्या चिन्हाच्या वर वाहत आहे.

या विनाशकारी पावसाचे कारण आहे गुजरातपासून उत्तर बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली ट्रफ रेषा. चक्रवाती परिस्थिती उत्तर बंगालच्या उपसागरापासून देखील समुद्र सपाटीपासून ६.७ किमी पर्यंत पसरलेली आहे. ही हवामान प्रणाली काही काळ टिकून राहण्याची शक्यता असल्याने, येत्या २४ तासांत नाशिक व त्याच्या आसपासच्या भागात एक किंवा दोन तीव्र सरींसह पावसाची अपेक्षा आहे, ज्यामुळे अधिक भागात पाणी साचेल आणि पूर येईल. त्यानंतर, तीव्रता कमी होईल, तथापि, पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस पडत आहे. २४ तासांनंतर उत्तर कोकण, गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागांत नाशिक, मालेगाव आणि आसपासच्या भागांत पावसाळी गतिविधी कमी होणे सुरु होईल.

प्रतिमा क्रेडीट: इंडियन एक्सप्रेस 

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try