गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडविला आहे. गेल्या ४८ तासांत विदर्भात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला आहे. खरं तर, हा आत्तापर्यंतच्या मान्सून हंगामातील सर्वात मोठा पाऊस ठरला आहे.
स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून नागपूरमध्ये ९३.६ मिमी, वर्धामध्ये ७८.५ मिमी,यवतमाळमध्ये ४९.६ मिमी, बुलढाणामध्ये ४६ मिमी, अकोलामध्ये ४४.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाचे श्रेय देशाच्या मध्यवर्ती भागात कायम असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला दिले जाऊ शकते. ही प्रणाली आता पश्चिम दिशेने सरकत असल्याने येत्या २४ तासात विदर्भ आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवस केवळ विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.
या मुसळधार पावसामुळे या भागांतील पावसाच्या आकडेवारीत निश्चितच सुधारणा केली असून ८ ऑगस्ट रोजी पावसाची कमतरता केवळ ३% आहे. आता पावसाचे आधिक्य झाले तरी आश्चर्याची बाब ठरणार नाही.
विदर्भाप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातही पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसून ऑगस्टच्या सुरूवातीपासूनच कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागांमधील बऱ्याच ठिकाणी अद्याप पूरस्थिती कायम आहे.
तथापि, पश्चिम किनारपट्टीवरील मान्सून लाटेची तीव्रता कमी होणार असल्याने दिलासादायक चित्र आहे. यामुळे पावसाळी गतिविधी कमी होतील, मात्र पुराचे पाणी कमी होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकेल.
Image Credits – DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather