सक्रिय मॉन्सूनमुळे येत्या २४ तासांत नागपूर, गोंदिया आणि रत्नागिरी येथे मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे आणि मुंबईत मध्यम पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात चांगला पाऊस पडला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस झाला तर विदर्भ, उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही हलका ते मध्यम पाऊस पडला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरी बरसल्या आहेत.
सध्या, ईशान्य अरबी समुद्रावर चक्रवाती अभिसरण असून ईशान्य मध्य प्रदेशात आणखी एक चक्रवाती अभिसरण आहे. ही प्रणाली वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील २४ ते ३६ तासांत महाराष्ट्रातील बर्याच भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान विदर्भ आणि दक्षिण कोकणात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
मात्र २४ तासानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल पण पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्रीवादळाची वायव्य दिशेने विदर्भाकडे वाटचाल सुरू असल्याने विदर्भामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे आणि मुंबई येथे आणखी २४ तास मध्यम तीव्रतेसह पावसाची शक्यता असून त्यानंतर पुण्यात पावसाचा जोर कमी होईल पण मुंबईत तुरळक प्रमाणात मध्यम पाऊस होऊ शकतो. या पावसामुळे भुईमूग, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, ऊस या पिकांना फायदा होईल.
स्कायमेटकडे असलेल्या आकडेवारीनुसार, कोकणात चांगला पाऊस पडल्यामुळे १ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान कोकणात पावसाचे आधिक्य ३३ टक्के तर मध्य महाराष्ट्रात ५३% आहे. चांगल्या सरी बरसून देखील विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ४% आणि २६% पावसाची कमतरता आहे.
Image Credits – Deccan Herald
Any information taken from here should be credited to Skymet Weather