[Marathi] Pune rains update: धरणातून पाणी सोडले, पुण्यातील ५००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

August 6, 2019 10:13 AM | Skymet Weather Team

Updated on August 6, 10:11 AM: धरणातून पाणी सोडले, पुण्यातील ५००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

पवना, मुळा आणि मुठा येथील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी वाहतूक पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ३० पैकी ६ पूल बंद केले होते. खडकवासला धरणातूनही मुठा नदीत ४५४७४ क्युसेक दराने पाणी सोडले गेले, जे गेल्या ८ वर्षात सर्वाधिक स्त्राव होण्याचे प्रमाण आहे.

लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यातील कमीतकमी ५००० लोकांना सामुदायिक हॉल व शाळांमध्ये हलविले आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने ६०० हून अधिक लोकांना वाचवले.

स्कायमेट हवामानाच्या हवामानकर्त्यांनुसार आता पुण्यात पावसाचा जोर कमी होईल. परंतु एक दोन ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Updated on August 5, 04:31 PM: पुण्यात येणाऱ्या २ ते ३ तास पाऊस सुरु राहील

पुण्यात पावसाने पुन्हा एकदा वेग पकडला असून मागील काही तासांत काही जोरदार सरी दिसून आली आहे. पुण्यातील पश्चिम जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून पुढील काही तास पाऊस असाच सुरु राहील. त्यानंतर पाऊस कमी होईल.

Updated on August 5, 10:34 AM: पुण्यात २१ तासांत ३८ मिलीमीटर पाऊस, आज जोरदार पावसाची शक्यता नाही

पुण्यातील पावसाने शहरावर कहर केला आहे. शहराच्या मुसळधार पावसाचा अंदाज पाहता शहरात शाळा बंद जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईतील शाळाही बंद जाहीर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून अखेर २१ तासांत पुण्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज मुसळधार पाऊस पडणार नाही परंतु शहराच्या काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शहरात आता पुराचे पाणी कमी होण्यास मदत होईल. तथापि, हे त्वरित होणार नाही आणि शहरात पुन्हा सामान्य स्थितीत जाण्यासाठी थोडा वेळ लागेल.

Updated on August 4, 4:30 PM: मुसळधार पावसामुळे पुण्यात रेल्वे वाहतुक विस्कळीत, पूरसदृश्य परिस्थितीमुळे ५०० कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले

गेल्या २४ तासांत पुण्यामध्ये ४५. ९ मिमी इतक्या जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी धरणांतून मुठा नदीत पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व लगतच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही शहरांमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोणावळ्याजवळ दरड कोसळल्याची घटनाही समोर आली आहे, त्यामुळे रेल्वे रुळांवर अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे मुंबईहून पुण्यात येणाऱ्या गाड्यांना विलंब होत आहे. या भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुक कल्याण-कसारा-नाशिक-मनमाडमार्गे वळविण्यात आली आहे. इतकेच नाही,तर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुणे महानगरपालिकेने ५०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

गुजरात किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारलेल्या ट्रफ रेषेमुळे असा जोरदार पाऊस पडत आहे. ही प्रणाली आणखी काही काळ कायम राहिल्याने पुढील २४ तास अशाच पावसाळी गतिविधी चालू राहतील.

पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल आणि हवामान आनंददायी आणि आरामदायक राहील. पुढील २४ तासांमध्ये ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, या भागांत पावसाचे प्रमाण कमी होईल.

या काळात शहरातील डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सध्या दिवसाचे तापमान सुमारे २७ अंशाच्या आसपास आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल.

पुण्याव्यतिरिक्त, मध्य महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही आगामी काळात मध्यम पावसाची नोंद होईल. चांगला पाऊस पडल्यामुळे मध्य महाराष्ट्रात ३ ऑगस्ट रोजी पावसाचे आधिक्य ४१% आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस पडणार असल्याने या भागांतील पावसाच्या आधिक्यात अजून वाढ होईल.

प्रतिमा क्रेडीट: Firstpost

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES