नैऋत्य मान्सूनमुळे पश्चिम किनारी भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत, दक्षिण कोकण आणि गोवा क्षेत्रामध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्याचप्रमाणे, कर्नाटकच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे, तर कर्नाटकाच्या उर्वरित किनारी भागात आणि केरळच्या उत्तरी किनारी भागात हलका ते मध्यम पाऊस नोंदविला गेला आहे.
गेल्या २४ तासांत वेंगुर्लामध्ये १६२ मिमी पावसाची नोंद झाली, तसेच माथेरानमध्ये १५४ मिमी, रत्नागिरीमध्ये १२२ मिमी आणि महाबळेश्वरमध्ये ११८ मिमी पावसाची नोंद झाली.
स्कायमेटनुसार, मान्सून कोकण आणि गोव्याच्या किनारी भागात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण गुजरात आणि दक्षिण बंगालच्या पूर्वोत्तर खाडीमधील चक्रवाती प्रणाली मुळे पुढील १८ ते २४ तासांत कोकणच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, या भागांत मान्सून सक्रिय राहील आणि जोरदार पाऊस सुरु राहील.
रत्नागिरी, हर्णे, सिंधुदुर्ग, कुलाबा, अलीबाग, गोवा, होनावर या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मंगळुरू, कोझिकोड आणि उडुपीसारख्या ठिकाणी मध्यम पाऊस स्वरूपाचा पडेल. पुढील १८ ते २४ तासांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडेल.
पुढील २४ तासानंतर, बंगालच्या उत्तर खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, पश्चिम किनारी भागातील पावसाचे प्रमाण कमी होईल, कारण या प्रणालीभोवती बाष्पाचे प्रमाण तुलनेने जास्त राहील.
महाराष्ट्राच्या इतर भागांविषयी बोलायचे झाल्यास, दक्षिण मध्य-महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे, तर विदर्भ
आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. याउलट, गेल्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या मध्य भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदविला गेला.
बंगालच्या पूर्वोत्तर खाडीमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर, उपरोक्त प्रणाली पश्चिम / उत्तरपश्चिमी दिशेने सरकल्यामुळे पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होईल. गोंदिया, नागपूर, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि परभणी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागांत पुढील काही दिवसात गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे