[Marathi] जुलै महिना पावसाळी राहिल्यानंतर नागपुरात आणखी आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज

July 31, 2019 7:39 PM | Skymet Weather Team

मान्सूनच्या हंगामाच्या सुरूवातीपासूनच महाराष्ट्र राज्यात चांगला पाऊस पडत आहे. अंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ हा सर्वात जास्त पावसाचा प्रदेश ठरला आहे. विदर्भातील सर्वाधिक लोकप्रिय शहरांपैकी एक नागपूर जे राज्याची हिवाळी राजधानी म्हणून पण ओळखले जाते इथे जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला आहे.

हिवाळ्यातील म्हणजेच डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याच्या खेरीज नागपुरात जवळजवळ प्रत्येक मोसमात पाऊस पडतो. नागपूरसाठी वर्षाकाठी असलेली पावसाची आकडेवारी ११०० मिमी आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शहरात सहसा चांगला पाऊस पडतो. जुलै महिन्यात सरासरी पाऊस २८७.८ मिमी तर ऑगस्टमध्ये २७६.५ मिमी इतका असतो. तथापि, यावेळी जुलैत अपवादात्मक पाऊस पडल्याने मागील सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. या हंगामात शहरात जुलै महिन्यात एकूण ५३३ मिमी पाऊस झाला आहे.

पुढचे पाच दिवस पुन्हा नागपुरात पाऊस पडणार आहे. पावसाचे स्वरूप हलके ते मध्यम असेल आणि आठवड्यात बहुतेक वेळेस आकाश ढगाळ राहील. येत्या पाच दिवसात नागपुरात मुसळधार पावसाचा अंदाज नाही. तथापि, शनिवार व रविवार दरम्यान म्हणजे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी नागपुरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

OTHER LATEST STORIES