[Marathi] मुंबईत मुसळधार पाऊस

August 5, 2016 3:23 PM | Skymet Weather Team

मुंबईमधे गेले बरेच दिवस चांगला पाऊस झालेला नव्हता त्यामुळे मुंबईकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेल्या २४ तासा पासून मात्र पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झालेली आहे.

सद्य-स्थितीत मुंबई शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झालेली असून ट्वीटर वर पण पर्जन्य रागाला सुरूवात झालेली आहे.

स्थानिक वृत्तानुसार,  बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (BKC) दरम्यान रहदारी मार्ग ठप्प आहेत आणि जे व्यक्ती सकाळी ९ ला त्यांची घरे सोडून निघाले होते ते अजूनही रस्त्यातच अडकले आहे. बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स मधील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साठले गेले आहे.  अग्रगण्य बँका आणि विमा कंपन्या काही कार्यालये बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स मधे आहेत. वांद्रे मधील सखल भागात पाणी साठल्यामुळे बरेच प्रवासी अडकून पडले आहेत, तसेच लीलावती भागात देखील पावसामुळे वाहतुक ठप्पझालेली आहे. पवई कडे जाणाऱ्या लोकांनी दोनदा विचार करावा कारण वातुकीचा बोजवारा उडाला आहे.

परळ भागात देखील पाणी साचले आहे. खरेदी करण्यासाठी बाहेर निघालेल्या व्यक्तीनी हिंदूंमाता भागात जाणे टाळावे, ह्या भागात गूढघ्या पर्यंत पाणी साचलेले आहे.

दादर व कुर्ला स्थानाकादरम्यानपाणी साचल्यामुळेलोकलची परिस्थिती सुद्धा वाईट आहे. इतर स्थानकांवर देखील पाणी साचलेले आहे वपाऊसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

स्थानिक वृत्तानुसार, तीस पेक्षा अधिक बेस्ट बसेसचा मार्ग पाणी साचल्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीमुळे वळविण्यात आला आहे.अंधेरी सबवे सुद्धा पाणीसाचल्यामुळे भरला आहे असे दिसते आणि सध्या बंद आहे.

दुपारी सुमारे 1:35 च्या सुमारास समुद्रात 4.05 मीटर उंचीच्या भरतीच्या लाटेची चेतावणी देखील जारी करण्यात आले आहे. धुर्कट वातावरणामुळे बांद्रा वरळी सी लिंक रोड सुद्धा अस्पष्ट दिसतो आहे.

पावसामुळे अनेक विमानांची उड्डाणे  विलंबित झाली आहेत. तसेच विमानातील प्रवास्यांनी केलेल्या ट्विट नुसार, बरीच विमाने अजूनही उड्डाणाच्या प्रतीक्षेत धावपट्टी वर आहेत.

स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात मुंबईत अजुन पावसाची अपेक्षा आहे. स्थानिक रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी किंवा घरीच राहिलेले बरे.

Image Credit: www.todayonline.com

Please Note: Any information picked up from here must be attributed to skymetweather.com

 

 

OTHER LATEST STORIES