बंगालच्या उपसागरात मान्सूनची हवामान प्रणाली तयार झाली असल्याने सध्यपरिस्थितीत मान्सून मध्य भारतावर सक्रीय आहे. तसेच अरबी समुद्रातही मान्सूनची हवामान प्रणाली तयार होताना दिसून आली आहे आणि त्यामुळेच केरळात पाऊस होईल.
जुलै महिन्यात केरळात झालेल्या कमी पावसामुळे नेहमीपेक्षा २७ % पावसाची तुट निर्माण झाली आहे आणि आता व ऑगस्ट मध्ये होणाऱ्या मध्यम ते तुरळक पावसाने हि तुट भरून निघेलच असे नाही.
सध्या दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांवर असलेल्या अति कमी दाबाचे क्षेत्राचा प्रभाव येत्या ४८ तासात कमी होईल आणि नंतरच केरळात ऑगस्ट ची सुरुवात मध्यम पावसाने होईल आणि २ ऑगस्ट पुढेही थोडा थोडा पाऊस होतच राहील.
सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र केरळवर असलेली सर्व आर्द्रता खेचून घेत असल्याने केरळात पाऊस कमी होतोय आणि राजस्थान आणि गुजरातमध्ये मात्र जोरदार पाऊस सुरु आहे.
जुलै महिन्यात भारताच्या दक्षिणी द्वीपकल्पच्या भागात नैऋत्य मान्सून तसा फारसा नसल्याने त्या भागातील राज्यात सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नैऋत्य मान्सून यंदा पश्चिमेकडे फारसा सक्रीय नसल्याने कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेशचा काही भाग आणि तेलंगाणा या भागांवर मान्सूनची लाट फारशी सशक्त नव्हती आणि त्यामुळेच या भागात कमी पाऊस झाला.
तसेच २ ऑगस्ट पासून द्वीपकल्पाच्या भागात पुन्हा मान्सूनचा पाऊस येईल कारण या भागातील कमी झालेली आर्द्रता भरून निघाली असून अति कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊन ते नाहीसे होईल.
Image credit- trekearth.com