[Marathi] जोरदार हिमवृष्टीच्या शक्यतेमुळे काश्मीर, हिमाचल, लडाख आणि उत्तराखंड मध्ये रेड अलर्ट, हिमस्खलनाचा धोका लक्षात घेता प्रवास करणे टाळावे

December 10, 2019 12:15 PM | Skymet Weather Team

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारताच्या डोंगररांगाना मध्ये या आठवड्यात व्यापक पाऊस आणि हिमवृष्टीचा सुरू राहण्याचा अंदाज आहे. या हंगामातील पाचवा सक्रिय आणि सर्वात तीव्र पश्चिमी विक्षोभ या हवामान परिस्थितीस जबाबदार असेल.

स्कायमेटनुसार, ही प्रणाली पश्चिम हिमालयात पोहोचली असून जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात आता कधीही विखुरलेला पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत. उद्यापर्यंत, तीव्रता आणि आवेग वाढेल आणि या राज्यांच्या वरच्या भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

१२ डिसेंबरपर्यंत उत्तराखंड राज्यात पाऊस आणि हिमवृष्टी होईल आणि संपूर्ण डोंगराळ प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. खरं तर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातला हा सर्वाधिक जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी आहे.

दरम्यान १२ आणि १३ डिसेंबर रोजी गारपीटीच्या घटनांसह भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात हिमस्खलन आणि पावसासंबंधीच्या घटनांचा जास्त धोका आहे. शिवाय, जोरदार हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग तसेच या राज्यांना जोडणारे अन्य अनेक प्रमुख रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

१४ डिसेंबरपासून मात्र परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, जेव्हा हि प्रणाली दूर होईल त्यामुळे हवामान विषयक गतिविधी कमी होऊ लागतील. मात्र प्रणालीच्या राहिलेल्या प्रभावामुळे १५ डिसेंबरपर्यंत विखुरलेला पाऊस आणि हिमवृष्टी सुरू राहू शकते.

पश्चिमी विक्षोभ चक्रवाती परिभ्रमण प्रेरीत करून आपला प्रभाव वायव्य आणि मध्य भारतापर्यंत वाढवू शकतो. या कालावधीत गारपीटीसह गडगडाट व पाऊस यांच्या रूपात त्याचा परिणाम दिसून येवू शकतो.

Image Credits – New Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES