मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून २४ तासांच्या कालावधीत ११८ मि.मी.पर्यंत तीन अंकी पावसाची नोंद झाली.
कालपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे शहराच्या काही भागांत जसे की सायन, दादर येथे पाणी साचले आणि वाहतुकीची कोंडी झाली.
स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी आज तसेच उद्याही मुंबईत काही जोरदार सरींसह पाऊस सुरु राहण्याच्या अंदाज वर्तविला आहे.
तीव्र सरींमुळे काही प्रकारचे व्यत्यय येऊ शकते. यामुळे शहराच्या काही भागांत वाहतुकीची कोंडी व पाण्याचे साचण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे बाहेर पडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे तापमानात घट दिसून येईल आणि हवामान सुखद राहील.
सध्या सुरू असलेला पावसाचे कारण आहे गुजरातच्या भागांवर बनलेली चक्रवाती परिस्थिती. या व्यतिरिक्त ओडिशा आणि त्याच्या आसपासच्या भागांवर कमी दाबाचा पट्टा आहे. या प्रणालीने पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनला सक्रिय केला आहे. शिवाय, एक विंड शेअर झोन उत्तर कोकण आणि गोवा ते ओडिशा पर्यंत मुख्य समुद्र पाटीपासून ३.६ कि.मी.पर्यंत पसरत आहे.
Image Credits – The Financial Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather