यावर्षी मॉनसून मुंबईत उशीरा दाखल झाला होता, परंतु आगमन दमदार झाले. मान्सूनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांतच मुंबईला पावसाने मंत्रमुग्ध केले व २८ जून रोजी सक्रिय झाला. मागील २१ तासांच्या कालावधीत मुंबईत २१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच सध्या शहर परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरूच आहे.
हवामानतज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमीतकमी पुढील २४ तास तरी मुंबईकरांना पावसापासून उसंत मिळणार नाही. शनिवारी देखील संपूर्ण शहरात जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाळी ढगांनी संपूर्ण मुंबई व्यापली आहे आणि जसजशी दिवसाची प्रगती होईल तास पावसाचा जोर वाढेल.
शहरात आधीच पूर सदृश्य परिस्थिती आहे, बरेच रस्ते पाण्याखाली आहेत ज्यामुळे दैनंदिन आयुष्य बाधित झाले आहे. मुंबईत आतापर्यंत जून महिन्याच्या ४९३ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ४०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महिना संपायला केवळ एक दिवस बाकी आहे, परंतु या पावसाळी गतिविधीकडे पाहता, एकवेळ अश्यक्य वाटत असलेले सरासरी गाठण्याचे लक्ष काबीज केले जाऊ शकेल. सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसापासून उसंत रविवार पासून पुढे मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.
पश्चिम किनारपट्टीलगत असलेली ट्रफ रेषा आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील चक्रवाती परिभ्रमण यामुळे मुंबईसह आणि कोकण भागाच्या किनारपट्टी लगतच्या भागावर मान्सून सक्रिय झाला आहे.
हवामानतज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस सुरु राहणार आहे. दरम्यान रविवारी पावसाचा जोर एकदम कमी होण्याची अपेक्षा आपण करू शकतो परंतु ३ जुलैपर्यंत कमी जास्त पाऊस सुरूच राहील. त्यानंतर बंगालच्या खाडीत विकसित होणारे कमी दाब क्षेत्र पुढील दिवसांत मध्य भारताद्वारे महाराष्ट्रात येणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरुवात होईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे