Skymet weather

[Marathi] मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल

August 5, 2019 10:21 AM |

mumbai weather

Updated on August 5, 10:18 AM: मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल

मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे आणि मुसळधार पाऊस नसल्यामुळे शहरात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवाय, मुंबई शहरासाठी येत्या काही दिवस पावसाचा जोर कमीच राहील.

खरं तर, मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल आणि पुढील काही दिवस तरी मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता नाही आहे.

Updated on August 4, 9:30 AM:  उद्या सकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस अपेक्षित, पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल विलंब होण्याची शक्यता

कालपासून मुंबईत पाऊस थांबला नाही आहे आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे कारण सध्या अनेक भागात पाणी साचले आहे. स्कायमेट वेदरने आधीच सांगितल्याप्रमाणे शनिवारी मुंबई शहरात तीन अंकी पावसाने हजेरी लावली.

या अतिवृष्टीचे कारण आहे बंगालच्या उपसागरावरील चक्रीय परिभ्रमण जे समुद्र पाटीपासून ६.७ कि.मी. आहे. शिवाय, दक्षिण गुजरात पासून एक ट्रफ रेषा विस्तारलेली आहे. या प्रणाली व्यतिरिक्त, अरबी समुद्राकडून जोरदार वारे मुंबई किनारपट्टीवर वाहत आहेत, ज्यामुळे शहर व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

मागील २४ तासांत आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत १७३ मि.मी. पावसाची नोंद सांताक्रूझवर झाली आहे, तर कुलाबा मध्ये पावसाने १०० मिमीचा टप्पा ओलांडला आहे.

कालपासून कांदिवली येथे १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर अनेक भागातही १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

आता, आम्ही अपेक्षा करतो की आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील. दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी साचण्याची समस्या दिसून येणार आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी नाकारता येत नाही. काही रेल्वे गाड्या मध्य रेल्वेने यापूर्वीच संपुष्टात आणल्या आहेत किंवा रद्द केल्या आहेत.

२४ तासांनंतर, क्षेत्रात पाऊस कमी होईल आणि परिस्थिती सुधार दिसून येईल. सुदैवाने, आज रविवार आहे आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे, हे पाहता मुंबईकरांना घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रतिमा क्रेडीट: The Financial Express

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try