तुरळक सरी वगळता मुंबई मध्ये पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. परंतु,काल दुपारनंतर मुंबईच्या काही भागांत आणि उपनगरात पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले.
मुंबईमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले असून मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे हिंदमाता आणि आसपासच्या भागात पाणी साचले आहे.
याशिवाय, गेल्या तीन तासांत पहाटे २:३० ते ५:३० या वेळेत सांताक्रूझ वेधशाळेत ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शहराच्या बऱ्याच भागांत अजूनही पाऊस कोसळत आहे. मुंबई विमानतळावरील दृश्यतामानता ३०० मीटरपर्यंत खाली आली आहे. दरम्यान मुंबईत पावसाचा जोर अजून वाढणार असल्याने हवाई उड्डाणे रद्द तसेच हवाई मार्गांत बदल अशा गोष्टींची शक्यता आहे.
स्कायमेट हवामानतज्ञांनुसार, मुंबईत आजही पाऊस पडणार असून पावसाचे प्रमाण तीव्र स्वरूपाचे असणार आहे. पुढील पाच ते सहा तासांत शहरात पावसाच्या काही तीव्र सरींची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे बऱ्याच भागांत पाणी साचण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवू शकते त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
स्थानिक चाकरमान्यांना देखील दैनंदिन कामकाजात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा प्रकारे, आज मुंबई शहरात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने मुंबईकर परत एकदा मुंबई पावसाचा तडाखा अनुभवतील.
प्रतिमा क्रेडीट: वॉइस ऑफ अमेरिका
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे