गेल्या १५ ते १८ तासांत मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक उड्डाणांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, सखल भागांत पाणी साचण्याची समस्या, लोकल सेवा विलंबाने तर काही गाडया रद्द केल्या आहेत तसेच मोठ्या प्माणात वाहतूक कोंडी झाली आहे. शिवाय, रात्रीपासून शहरामध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. या मुसळधार पावसाबरोबर वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट ही आहे.
पावसाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास काल सकाळी ८:३० पासून गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये २१९ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय १२ तासात पावसाने जोर धरला असून शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई मध्ये दिवसाची सुरुवातच जोरदार पावसाने झाली. आजच्या पावसाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास आज मुंबई शहरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु राहण्याची अपेक्षा करू शकतो. शिवाय बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही. पावसाची तीव्रता काल सारखी कदाचित नसेल परंतु तरीही पाऊस जोरदार राहील.
मुंबईत पाऊस लागून राहण्याची अपेक्षा नसून थोडाकाळ खंड पडण्याची शक्यता आहे. बर्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज देखील सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवणं अपेक्षित आहे.