Skymet weather

[Marathi] मुंबई पाऊस २०१९: मुंबईत मान्सूनचा जोर वाढलेला असून आज जोरदार पावसाची अपेक्षा

June 28, 2019 10:48 AM |

mumbai rains

मुंबईत गेल्या २४ तासांत पावसाने जोर पकडलेला आहे व काल पासून मुंबईत बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. २५ जून रोजी मुंबईत दक्षिण- पश्चिम मान्सून २०१९ चे आगमन झाले होते, तथापि पावसाचा जोर कमीच राहिलेला होता. परंतु, गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे असे दिसून येत आहे कि मान्सूनने मुंबईवर जोर पकडलेला आहे व येणाऱ्या दिवसांत मुंबईत खूप जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

कालपासून, मुंबईत पावसाची गतिविधी सुरू झाली आणि काल रात्री पनवेल, बदलापूर, शहापूर आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. बीकेसी, कुर्ला, वाशी, चेंबूर, सांता क्रूझ, कोलाबा, बोरिवली, कांदिवली आणि काही इतर भागांवर देखील पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

गुरुवारी सकाळी 8:30 वाजता पासून गेल्या 24 तासांत, कोलाबा येथे 3 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर सांता क्रूझमध्ये 4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आजही सकाळी मुंबईत ढगाळ आकाशासह पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मुंबईत मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढलेला आहे आणि तेव्हापासून मुंबईवर पाऊस सुरूच आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत पाऊस आज दिवसभर चालू राहण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अनुभवण्यात येईल. सूर्याचे चिन्ह नसताना दिवसभर आकाशात ढगाळ राहील. आज मुंबईत पाऊस जोरदार होईल आणि उद्याही पाऊस सुरू राहील.

वाहतूक जाम आणि जोरदार पावसाच्या समस्येसह इतर अनेक समस्या पाहिल्या जाऊ शकतात.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try