दीर्घकाळ उष्ण व कोरड्या वातावरणानंतर देशाची आर्थिक राजधानी, मुंबई मध्ये सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनाला जरी विलंब झाला तरी आता प्रतीक्षा संपली असून आगामी काही दिवसांतच मुंबईकर मुसळधार मोसमी पावसाचा अनुभव घेतील. बऱ्याच प्रसार माध्यमांच्या अहवालांनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबई मधील बऱ्याच भागात पाणी साचले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आणि रस्त्यांवर वाहतूककोंडी ची समस्या भेडसावत आहे. धारावी आणि पूर्व वसई मधील भोईदापाडा नाका येथे खूप प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे मधील मखमली तलाव, सायन आणि हिंदमाता सिनेमाच्या परिसरात देखील पाणी साचले आहे.*
अंधेरीच्या भुयारी मार्गात पाणी साचले असून रहदारीसाठी सेवा तात्पुरती निलंबित केली गेली आहे. प्रवाश्यांना अंधेरी पश्चिम ते पूर्व लाइनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी काही तासांचा अवधी लागत आहे. बांद्रा मधील राष्ट्रीय महाविद्यालया जवळील एसव्ही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.*
धारावी आणि पश्चिम राष्ट्रीय महामार्गासह शहराच्या बऱ्याच भागांत वाहतूक कोंडी झाली आहे. उपनगरांना मुख्य शहराशी जोडणाऱ्या पश्चिम महामार्गावर वाहतूककोंडी मुळे अनेक प्रवासी रस्त्यात अडकले आहेत. मार्ग क्र. ४९४ आणि ४९९ या मार्गांवरील वाहतूक वंदना थिएटर (ठाणे) कडे वळविण्यात आली आहे. मार्ग क्रमांक १,४,५,६,७,८,११ आणि २१ वरील वाहतूक हिंदमाता पुलावरून वळविण्यात आली आहे.
एएनआयच्या अनुसार, स्थानिक रेल्वे आणि विमान सेवा नेहमी प्रमाणे सुरु राहतील,मात्र सकाळी ९ च्या सुमारास बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दृश्यता १५०० मीटरवर नोंदवली गेली आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे