मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने हाहाकार उडाला होता, तीन दिवसांच्या कालावधीत ५०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. खरं तर, जूनच्या शेवटच्या तीन दिवसातही खूपच जोरदार पाऊस झाला होता आणि त्यामुळे मुंबई शहरासाठी तो निर्दयी पावसाचा आठवडा राहिला.
जुलैच्या पहिल्याच दिवशी शहरात ३७५ मिमी पावसाची नोंद झाली होती, ज्याची दशकातील २४ तासांतील उच्चांकी पाऊस म्हणून नोंद केली गेली. तसेच गेल्या ४४ वर्षांतील नोंदवलेल्या उच्चांकी पावसाच्या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर हा पाऊस आहे. खरं तर, मुंबईत पहिल्या दोन दिवसातच जुलै महिन्यातील सरासरीच्या निम्म्याहून अधिक पाऊस झाला आहे.
काल मुंबई शहरात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले, सांताक्रूजमध्ये ४ मिमी तर कुलाबामध्ये १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या थोड्या प्रमाणात कमी झाली असून शहरातील दळणवळण पूर्वपदावर येण्यासाठी ह्या गोष्टीचा फायदा होत आहे.
दरम्यान आज पहाटे उपनगरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी चांगला पाऊस अनुभवला गेला.
मुंबईच्या सानिध्यात असलेला कमी दाबाचा पट्टा लक्षात घेता ३ ते ५ जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तथापि, ही प्रणाली उत्तरेकडे राजस्थान आणि आसपासच्या मध्यप्रदेशात सरकल्यामुळे त्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान आज मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, त्याकाळात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थोड्या कालावधीसाठी एक-दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय २४ तासांच्या कालावधीत काही ठिकाणी ३० ते ५० मि.मी. पावसाची नोंद होवू शकते.
तथापि, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नसून पुढील काही दिवस मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु राहील ज्यादरम्यान एक दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे