Skymet weather

[Marathi] Pune Rains: पुण्यात पुढील २ ते ३ दिवस मध्यम पाऊस सुरू राहील

July 28, 2019 11:46 AM |

 पुणे पाऊस

Updated on July 28, 2019, 11:45 AM: पुण्यात पुढील 2 ते 3 दिवस मध्यम पाऊस सुरू राहील

गेल्या २४ तासांत ३२ मि.मी. मध्यम ते मुसळधार पावसाने पुणे शहरात हजेरी लावली आहे. या सरींचे कारण पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय असलेला मान्सून आहे. शिवाय, पुढील दोन ते तीन दिवस मध्यम पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

या हवामान प्रक्रियांमुळे दिवसाचे तापमान २५ ते २६ अंश तर रात्रीचे तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या जवळ राहील. तथापि वातावरणात आर्द्रता जास्त राहील. मध्यम वारा देखील वाहील.

Updated on July 27, 2019, 11:33 AM: पुण्यात ७२ मिलीमीटर पाऊस, अजून जोरदार सरींची शक्यता

गेल्या २४ तासांत पुण्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यात आज सकाळी ५:३० वाजेपर्यंत ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात शहरातील झालेला हा सर्वात तीव्र पाऊस होता. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय असलेले मान्सून ह्या पावसाचे कारण होते.

सध्या, एक ट्रफ रेषा दक्षिण गुजरात पासून कर्नाटकच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहार. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण गुजरातवर बनलेली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस पडला. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा वेग वाढला आहे. पुण्यामध्येही गेल्या २ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

केवळ पुणेच नव्हे तर नाशिक, अहमदनगर, सांगली, सातारा यासह मध्य महाराष्ट्रातही २९ जुलैपर्यंत चांगला पाऊस पडत राहील.

सखल भागांमध्ये पाणी साचणे आणि रहदारी विस्कळीत होणे अपेक्षित आहे. तथापि, शनिवार व रविवार रोजी हा पाऊस कोसळत असल्याने बहुतांश कार्यालये व महाविद्यालये बंद राहतील.

तरीही पुन्हा सोमवारी शहरात पावसाची तीव्रता वाढू शकते. अशा प्रकारे, रहिवाशांना तयार रहावे लागेल. त्यानंतर मंगळवारपासून हवामान स्पष्ट होण्यास सुरवात होईल. जरी चालू किंवा बंद पाऊस पडत असला तरी तो जीवनात अडथळा आणणार नाही.

यापूर्वी २८ आणि २९ जून रोजी पुण्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर प्रामुख्याने अधून मधून पावसासह हवामान मुख्यतः कोरडेच होते. हा जुलैचा पहिला तीव्र पाऊस आहे.






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try