सध्या चालू असलेल्या संततधारेमुळे मुंबईत सर्वत्र पाणी साठणे आत्ता नित्याचे झाले आहे आणि असा मुसळधार पाऊस पुढेही काही काळ असाच चालू राहील.
अरबी समुद्रात असलेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र काल गुजरातच्या किनारपट्टीजवळ सरकले आहे. भारताच्या पश्चिमी किनारपट्टीला समांतर असलेला गुजरात ते केरळमधील कमी दाबाचा पट्टा या प्रणालीमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढवत आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या दोन्ही प्रणालींचा एकत्रित प्रभावामुळे मुंबईत सर्वत्र जोरदार पाऊस होत असून अजूनही काही दिवस असाच जोरदार पाऊस होत राहील.
सध्या या पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी पाणी साठून होणाऱ्या त्रासात भर म्हणून दिवसातून दोन वेळा तरी समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे.
कालपर्यंत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झाले आहेच पण त्याबरोबरच मुंबईबाहेर जाणाऱ्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, कारण बऱ्याच विमानाचे उड्डाण उशिरा करण्यात आले असून काही उड्डाणे तर दुसरीकडे वळविण्यात आली आहेत. पावसाचे पाणी घरात शिरू नये यासाठी लोकं आपआपली घरे सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कालपर्यंत २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेले ठिकाणे पुढीलप्रमाणे चेंबूर २४२ मिमी, दादर २४६ मिमी आणि मालाड येथे २७३ मिमी.